असावा सुंदर चांदीचा बंगला, चंदेरी, सोनेरी लखलखता चांगला! काँग्रेस आमदाराची अफाट संपत्ती!

व्हिडीओ व्हायरल

असावा सुंदर चांदीचा बंगला, चंदेरी, सोनेरी लखलखता चांगला! काँग्रेस आमदाराची अफाट संपत्ती!
सहसा करोडपतींच्या घरात आपल्याला चांदीचे ताट, चष्मा, पूजेच्या वस्तू दिसतात. पण एका आमदाराच्या घरात या सर्व वस्तू दिसल्या तर?. हो हे खर आहे. तेलंगणा राज्यातील एका काँग्रेस आमदाराच्या घराचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये चांदीचे फर्निचर, झुंबर, घोडे या सर्व गोष्ट व्हिडीओमधून दिसून आल्या आहेत.
अनिरुद्ध रेड्डी असे या काँग्रेस आमदाराचे नाव असून ते जुडचर्ला मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. काँग्रेस आमदार अनिरुद्ध रेड्डी यांच्या घराचे चित्रण YOYO यूट्यूब चॅनलने आपल्या चॅनलवर अपलोड केले. यामध्ये यूट्यूबरने आमदाराच्या संपूर्ण घराचा फेरफटका मारत घरातील फर्निचर, झुंबरची माहिती घेतली. यामध्ये आमदाराचे आलिशान जीवन दिसून आले.
हा व्हिडीओ जेव्हा यूट्यूबवर आल्यानंतर सर्वजण अवाक झाले. आमदाराच्या आलिशान घरामध्ये चांदीचे पलंग, बेडरूममध्ये चांदीचे डायनिंग टेबल, रोझवुडचा डायनिंग टेबल दिसून आला. घरामध्ये मोठ-मोठे झुंबर, महागड्या किमतीचे फर्निचर दिसून आले. आमदाराचे निवास चांदीने लख्ख असे चमकत होते. विशेष म्हणजे, आमदाराच्या घरामध्ये घोड्यांसाठी बांधण्यात आलेला तबेला दिसून आला, ज्यामध्ये चार-पाच हून अधिक घोडे असल्याचे व्हिडीओमधून दिसत आहे.
हे ही वाचा : 
पूजा दानोळेच्या रूपेरी यशाने महाराष्ट्राला महिलांना विजेतेपद!
मुंडे-अजितदादा दोघेही आरसा साफ करतायत…
महाराष्ट्राच्या नेमबाजांनी राष्ट्रीय स्पर्धेत घेतला अचूक वेध!
२०१२ मध्ये हाकलून लावलेले बांगलादेशी अजमेर दर्ग्याजवळ आढळले, दोघांना अटक!
दरम्यान, काँग्रेस आमदाराच्या आलिशान घराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मिडीयावर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. एका नेटकऱ्याने तर म्हटले, इंदिराजींनी ‘गरीबी हटाओ’चा नारा दिला पण त्याचा खरा फायदा कोणाला झाला याचा अंदाज तुम्ही लावू शकता का?
भाजपाच्या नेत्यांनीही हा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.
Exit mobile version