४१ श्रमिक १७ दिवस ज्या बोगद्यात अडकले, त्या सिलक्यारा बोगद्याच्या निर्मितीचे काम भूगर्भीय सर्वेक्षण, सुरक्षा ऑडिटसह याच महिन्यात सुरू होईल. राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत विकास निगम लिमिटेड (एनएचआयडीसीएल)ने याची तयारी सुरू केली आहे. कोणतीही चूक होऊ नये, याची दक्षता बाळगण्यात येत आहे.
राडारोडा हटवण्याचे आणि भुयारी मार्ग बनवण्याचे काम याच महिन्यात सुरू होणार आहे. मात्र काम सुरू करण्याआधी भूगर्भीय सर्वेक्षण आणि सुरक्षा ऑडिट केले जाईल. त्यासोबतच राडारोडा हटवण्याचे काम सुरू केले जाईल. संपूर्ण दक्षता घेऊन २०२४पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सिलक्यारा बोगद्याच्या डीपीआरमध्ये भूगर्भीय तपासणीचा जो अहवाल आला आहे, तो चुकीचा निघाला आहे.
हे ही वाचा:
भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून विक्रम रचला!
तेलंगणामध्ये हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, दोन वैमानिकांचा मृत्यू!
२०२४ ला देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात!
या अहवालात हा डोंगर कठीण खडकाचा असल्याचे नमूद केले होते. मात्र जेव्हा काम सुरू केले, तेव्हा येथील माती भुसभुशीत असल्याचे आढळले. त्यामुळे आता पुन्हा जीओ सर्वेक्षण केले जाईल. परिवहन मंत्रालयाने अद्याप बोगद्याच्या अपघाताप्रकरणी कोणत्याही चौकशी समितीची स्थापना केलेली नाही. तपासातच बोगद्याच्या कामात निष्काळजी कोणी केली, हे स्पष्ट होणार आहे.
सिलक्यारा बोगद्याची लांबी सुमारे ४५०० मीटर (४.५ किमी) आहे. सिलक्यारापासून सुमारे दोन हजार ३५० मीटर आणि बडकोटच्या दिशेने सुमारे १६००मीटरपर्यंत बोगदा खोदण्यात आला आहे. मधला केवळ ४८३ मीटरचा भाग खोदणे अद्याप बाकी आहे. या बोगद्याच्या निर्मितीसाठी सुमारे ८५३ कोटी ७९ लाख रुपये खर्च होत आहेत.