अटारी सीमेवर शिख भाविकांनी फाडले कोविड रिपोर्ट

अटारी सीमेवर शिख भाविकांनी फाडले कोविड रिपोर्ट

पाकिस्तानातून तीर्थयात्रेवरून परत येणाऱ्या किमान १०० शिख भाविकांनी कोविड पॉजिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या चाचण्याचे रिपोर्ट फाडून टाकण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. हे यात्रेकरून पाकिस्तानात तीर्थयात्रेसाठी गेलेल्या ८१५ भाविकांपैकी होते.

पंजाबमधून हे सर्व भाविक बैसाखी निमित्त लाहोरच्या पंजाब साहिब गुरूद्वारामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी कर्तारपूर येथील दरबार साहिब गुरूद्वाराला देखील भेट दिली. त्याबरोबरच हे भाविक पाकिस्तानातील इतर काही ठिकाणी देखील जाऊन आले.

हे ही वाचा:

सुनील मानेच होता, मनसुखला फोन करणारा तावडे

भारताने गाठला लसीकरणात महत्त्वाचा टप्पा

इथे मिळेल ‘ई- पास’

मोदी सरकारकडून देशातील गरीबांना मिळणार मोफत धान्य

परतीच्या प्रवासात अटारी सीमेवर त्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यावेळेला यापैकी काही भाविक हे कोरोना पॉजिटीव्ह आढळले. जे कोरोना निगेटिव्ह आढळले त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली, तर जे पॉजिटीव्ह होते त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

या सगळ्या प्रकरणात मात्र काही अप्रिय घटना घडल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यापैकी काही कोरोना बाधितांनी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. त्याबरोबरच त्यांनी त्यांचे कोविड चाचणीचे रिपोर्टही फाडून टाकले आणि कर्मचाऱ्यांकडील नोंदींची देखील नासधूस करण्याचा अत्यंत संतापजनक कृत्य देखील केले. या चाचणीत कोविड पॉजिटिव्ह आल्यानंतर या भाविकांनी दावा केला की, ज्यावेळी ते पाकिस्तानात जाण्यासाठी निघाले तेव्हा ते कोविड चाचणीत निगेटिव्ह आढळले होते.

या रुग्णांना सध्या घरगुती स्तरावरच विलगीकरणात राहण्यास सांगितले आहे. सरकारकडून अशा प्रकारच्या रुग्णांना हाताळण्यासाठी कोणतीही सोय करण्यात आली नसल्याचे देखील सांगितले जात आहे.

शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटी (एसजीपीसी) या सर्व यात्रांचे प्रायोजन करते. या संस्थेच्या अध्यक्षा बीबी जागिर कौर यांनी सांगितले, की ज्या भाविकांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज असेल त्यांचा खर्च एसजीपीसी तर्फे केला जाईल.

Exit mobile version