भारतातील शीख समुदायाच्या परिस्थितीबद्दल केलेल्या विधानाबद्दल भाजप समर्थित शीख गटाने आज (११ सप्टेंबर) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी जनपथ रस्त्यावरील पोलिस बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला गेला.
काँग्रेस नेते राहुल गांधी चार दिवस युएस दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या युएस दौऱ्यावर सर्वांकडून टीका होत आहे. राहुल गांधी दौऱ्यादरम्यान सभेला संबोधित करताना भारत विरोधी वक्तव्य करत आहेत, यामध्ये भारतातील शिख , आरक्षण अशा अनेक गोष्टींवर भाष्य केल आहे. राहुल गांधींच्या भारत विरोधी वक्तव्यामुळे त्यांच्याविरुद्ध देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा :
उधमपूरच्या कठुआ सीमेवर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान !
गणेशमूर्तींच्या विटंबनेसाठी केला मुलांचा वापर !
काँग्रेसचे खोटे नरेटिव्ह राहुल गांधींमुळे पुरते स्पष्ट !
यावरून आज भारतीय जनता पक्षाच्या शीख समर्थकांनी नवी दिल्लीतील जनपथ रोड येथे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींच्या विरोधात निदर्शने केली. आंदोलनादरम्यान भाजप नेते आरपी सिंग आणि इतर शीख नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती एएनआयने दिली आहे.
आंदोलनादरम्यान आरपी सिंह म्हणाले, राहुल गांधींनी माफी मागावी. त्यांनी भारताची बदनामी करण्यासाठी परदेशी भूमीचा वापर केला आणि भारतात शिखांना पगडी घालण्यास परवानगी द्यायची की नाही, शिखांना कडे घालण्याची किंवा गुरुद्वारात जाण्याची परवानगी आहे की नाही? केवळ शीख धर्मातच नव्हे तर सर्व धर्मात ही बंधने आहेत, असे वक्तव्य केले. राहुल गांधीनी माफी मागावी, असे आरपी सिंह म्हणाले. या आंदोलनामध्ये महिलांचाही समावेश होता.