पाकिस्तानकडून अफगाणिस्तानी निर्वासितांवर क्रूर अत्याचार!

१७ लाख अफगाणी हाकलून लावले

पाकिस्तानकडून अफगाणिस्तानी निर्वासितांवर क्रूर अत्याचार!

पाकिस्तानने निर्वासित अफगाणिस्तानी नागरिकांना जबरदस्तीने देशातून हाकलून लावण्यास सुरुवात केली आहे. १७ लाखांहून अधिक निर्वासितांनी नाईलाजाने घरे सोडावीत, यासाठी क्रूरतेची पातळी गाठत त्यांची घरे तोडली जात आहेत, त्यांच्याकडून पैसे हिसकावून घेतले जात आहेत. तसेच, अटकेची भीती दाखवली जात आहे.

पाकिस्तानने ३ ऑक्टोबर रोजी सुमारे २० लाख अफगाणी नागरिकांना इशारा देऊन एक महिन्याच्या आत पाकिस्तान सोडून जाण्याचा इशारा दिला होता. या दरम्यान संयुक्त राष्ट्र आणि पाश्चिमात्य देशांनाही अशा प्रकारे या निर्वासितांची हकालपट्टी करू नये, असे आवाहन केले होते. संयुक्त राष्ट्र निर्वासित उच्च आयोगानुसार, पाकिस्तानमध्ये सुमारे ४० लाख अफगाणी निर्वासित आहेत. यातील २०लाखांहून अधिक नागरिक ४० वर्षांपासून पाकिस्तानमध्ये राहात आहेत. काहींचा तर जन्मच येथे झाला आहे. तर, सुमारे २० लाख अफगाणी सन २०२१मध्ये अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यानंतर आले होते.

खैबर जिल्ह्याच्या उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी अफगाण तोरखम सीमेवरून सुमारे २४ हजार लोक अफगाणिस्तानात दाखल झाले. तर, पाकिस्तान सरकारच्या मते, दोन लाखांहून अधिक नागरिक स्वतःहून पाकिस्तान सोडून गेले आहेत. पाकिस्तानमध्ये पोहोचलेली एक व्यक्ती रडत रडत सांगत होती की, पाकिस्तानी पोलिसांनी त्यांच्याकडून ५० हजार पाकिस्तानी रुपये हिसकावून घेतले. पोलिसांचे असे म्हणणे होते की, ते पाकिस्तानी चलन अफगाणिस्तानात घेऊन जाऊ शकत नाहीत.

हे ही वाचा:

“ज्या व्यक्तीने राष्ट्रवादाचा झेंडा खांद्यावर घेतला त्या व्यक्तीचा टॅग डोक्यावर लावून घेण्यास हरकत नाही”

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर मागे; सरकारला २ जानेवारीपर्यंत दिला वेळ

मराठा आरक्षणामुळे संभाजीनगरातील आठ आगाराच्या एसटी बस जागेवरच!

बँक कर्जाचे पैसे जेटच्या संस्थापकांनी पत्नी, मुलाच्या माध्यमातून इतरत्र वळवले

पाकिस्तानी सुरक्षा दलाने हजारो लोकांच्या घरावर बुलडोझर फिरवला आहे. हे अफगाणी निर्वासित त्याच ढिगाऱ्यातून आपले महत्त्वाचे सामान शोधून अफगाणिस्तानात परतत आहेत. तर, तिकडे सीमेवरही लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिक तहानभुकेने कळवळत आहेत. नवजात अर्भकही दूध-पाण्यावाचून तडफडत आहेत.

मुस्लिमांची भलामण करणाऱ्या देशांचे मौन
इस्लाम आणि मुस्लिमांची राजवट असलेले देशच जर पाकिस्तानच्या क्रूरतेवर मौन बाळगून आहेत तर जगातील अन्य दुसऱ्या देशांत होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवायलाच नको, अशी भावना येथील अफगाणी निर्वासित बोलून दाखवत आहेत. भारतात घुसलेल्या रोहिंग्या घुसखोरांबाबत पाकिस्तानने आकांडतांडव केले होते. आता पाकिस्तान स्वतः एक इस्लामिक देश असूनही अफगाणिस्तानच्या निर्वासितांना हाकलून लावत आहे.

Exit mobile version