सिद्धू मूसेवाला याचे वडील म्हणतात, पंजाब सरकारकडून होतोय छळ

सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून सर्व कागदपत्रे आपण लवकरच सादर करणार असल्याचे आश्वासन

सिद्धू मूसेवाला याचे वडील म्हणतात, पंजाब सरकारकडून होतोय छळ

दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याचे वडील बलकौर सिंग आणि त्यांची पत्नी चरण कौर यांनी १७ मार्च रोजी एका मुलाला जन्म दिला. दोन वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या एकमेव मुलाला गमावले होते. मात्र या मुलाचा जन्म झाल्यानंतर भगवंत मान यांच्या पंजाब सरकारकडून आपला छळ केला जात असल्याचा आरोप मूसेवाला याच्या वडिलांनी केला आहे.

सिद्धू मुसेवाला याचे खरे नाव शुभदीप सिंग असे होते. दोन वर्षांपूर्वी त्याची हत्या झाली होती. शुभदीप हा बलकौर सिंग आणि त्यांची पत्नी चरण कौर यांचा एकमेव मुलगा होता. त्यांना १७ मार्च रोजी दुसरा मुलगा झाला. त्यानंतर बलकौर सिंग यांनी इन्स्टाग्राम पोस्टवर याबाबत लिहिले आहे, ‘वाहेगुरूंच्या कृपेमुळे आम्हाला आमचा शुभदीप परत मिळाला आहे. परंतु सकाळपासून सरकारकडून आमचा छळ सुरू आहे. ते आम्हाला आमच्या मुलाची कागदपत्रे सादर करण्यास सांगत आहेत. हे मूल कायदेशीर असल्याचे सिद्ध करावे, असे आम्हाला सांगितले जात आहे,’ असे त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले आहे. या वयस्कर जोडप्याने ‘आयव्हीएफ’च्या माध्यमातून अपत्याला जन्म दिला आहे. अर्थात बलकौर याने याबाबतचा उल्लेख केलेला नाही.

हे ही वाचा:

प्युअर व्हेज फ्लीट सेवेच्या ‘टी-शर्ट’ वरून झोमॅटोचा युटर्न!

मुस्लिम आता व्होट बँक राहिलेल्या नाहीत?

‘मला किंग म्हणून हाक मारू नका’

बंद दाराआड चर्चा: भाजपाने जुळवले शिवसेना + ठाकरे समीकरण?

डिसेंबर, २०२१मध्ये केंद्र सरकारने कृत्रिम प्रजनन तंत्रज्ञान (रेग्युलेशन) कायद्यांतर्गत ‘आयव्हीएफ’साठी नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महिलांना २१ ते ५० वर्षांची तर, पुरुषांना २१ ते ५५ वर्षांच्या वयाची अट ठेवली होती. ‘मला सरकारला, विशेषत: मुख्यमंत्री भगवंत मान यांना विनंती करायची आहे की, सर्व उपचार पूर्ण करण्याची मला परवानगी द्यावी. मी येथेच आहे आणि तुम्ही मला चौकशीसाठी जेव्हा बोलवाल, तिथे मी येईन,’ असे बलकौर सिंग म्हणाले. आपण सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून सर्व कागदपत्रे आपण लवकरच सादर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सिद्धू मूसेवाला याची पंजाबच्या मानसा जिल्ह्यात २९ मे २०२२ रोजी हल्लेखोरांनी हत्या केली होती. तो २८ वर्षांचा होता. त्याच वर्षी त्याने मानसातून काँग्रेसच्या तिकिटावर पंजाब विधानसभेची निवडणूक लढवली होती, परंतु त्याचा पराभव झाला होता.

Exit mobile version