24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषबिहारच्या सिद्धेश्वर नाथ मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू

बिहारच्या सिद्धेश्वर नाथ मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू

दुर्घटनेत ३५ हून अधिक भाविक जखमी

Google News Follow

Related

बिहारच्या जहानाबाद येथील सिद्धेश्वर नाथ मंदिरात मोठी दुर्घटना घडली आहे. श्रावण सोमवार असल्यामुळे भगवान शिवच्या जलाभिषेकाच्या वेळी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत चेंगराचेंगरी होऊन सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिलांचाही समावेश आहे. तसेच या दुर्घटनेत ३५ हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

सोमवारी पहाटे श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारनिमित्त सिद्धेश्वर नाथ मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी एवढी होती की भाविकांनी एकमेकांना धक्काबुक्की सुरू केली. काही वेळातच चेंगराचेंगरी झाली आणि यात सात जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जेहानाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.

जहानाबादच्या पोलीस निरीक्षकांनी या चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्य झाल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं की ३५ भाविक जखमी झाले असून त्यापैकी काहींना शासकीय रुग्णालयात नेलं आहे. तर काहींना मखदुमपूर रुग्णालयात नेण्यात आलं आहे. दरम्यान, या चेंगराचेंगरीत एका व्यक्तीच्या कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाला असून त्या व्यक्तीने या चेंगराचेंगरीच्या घटनेचं खापर प्रशासनावर फोडलं आहे. त्यांनी सांगितलं की मंदिरातील गर्दीचं नियोजन केलं गेलं नाही, तसेच येथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती.

काहींनी माहिती देताना म्हटलं की, प्रशासनाने एनसीसीमधील तरुणांना सुरक्षा आणि येथील व्यवस्था पाहण्यासाठी तैनात केलं आहे. मात्र, त्यांनी भाविकांवर लाठीहल्ला केला. ज्यामुळे भाविक धावपळ करू लागले. त्यातून मोठा गोंधळ उडाला आणि ही चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली.

हे ही वाचा:

‘माझ्या नादाला लागू नका’, माझा महाराष्ट्र सैनिक काय करेल हे कळणार नाही !

माध्यमांनो, खऱ्या बातम्या द्या, नाहीतर टाळे लावू!

शेख हसिना म्हणाल्या, अमेरिकेनेच आपल्याला सत्तेवरून हटवले

बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या आत्याचाराविरोधात सांगलीत निषेध सभा

श्रावण महिन्यात भाविक या मंदिरात दर्शनासाठी जातात. प्रामुख्याने रविवारी रात्रीपासून मंदिरात लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. आसपासच्या गावांमधून, तालुक्यांमधून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. आज (१२ ऑगस्ट) श्रावणी सोमवार असल्यामुळे काल रात्रीपासूनच भाविकांनी या मंदिरात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. अशातच ही दुर्घटना घडली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा