25 C
Mumbai
Thursday, November 28, 2024
घरविशेषशुभमन गिल, राशिद खान यांनी साकारला गुजरातचा विजय

शुभमन गिल, राशिद खान यांनी साकारला गुजरातचा विजय

Google News Follow

Related

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर शेवटच्या षटकापर्यंत थरारक झालेल्या सामन्यात गुजरातने यशस्वीपणे लक्ष्याचा पाठलाग करून राजस्थानवर विजय मिळवला. हंगामाच्या सुरुवातीला सलग पाच सामने जिंकण्याची कामगिरी दुसऱ्यांदा करण्याची राजस्थानची संधी हुकली.

गुजरातकडून शुभमन गिल, राहुल तेवातिया आणि राशिद खान यांनी चांगली खेळी केली. राशिद खान याने ११ चेंडूंत २४ धावा करून विजय मिळवून दिला. गुजरातने या हंगामातील तिसऱ्या विजयाची नोंद केली. शेवटच्या षटकात १५ धावा हव्या असताना राशिद खान मैदानावर उतरला आणि त्याने गुजरातला विजय मिळवून दिला. त्याने गोलंदाजीतही चमक दाखवली. केवळ १८ धावा देऊन राशिदने एक विकेटही घेतली. अर्थातच त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

कर्णधार शुभमन गिलने कर्णधाराला साजेशी खेळी करत यजुवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांच्या गोलंदाजीवर तुफान फलंदाजी करून आयपीएलमधील २०वे अर्धशतक ठोकले. मात्र तो बाद झाल्यानंतर गुजरातला शेवटच्या चार षटकांत ५९ धावा हव्या होत्या. पदार्पणाची संधी लाभलेल्या गुजरातच्या शाहरुख खान याने एक षटकार व एक चौकार लगावून आठ चेंडूंत १४ धावा केल्या. राहुल तेवातिया यानेही ११ चेंडूंत २२ धावा केल्या. तर, राशिद खान याने गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

हे ही वाचा:

एलॉन मस्क लवकरच भारत भेटीवर

ओवेसिंच्या विरोधात कॉंग्रेस उमेदवार देणार नाही

परगाणा भागात इस्लामवाद्यांचा हिंदुंवर हल्ला

रश्मी बर्वेंना दणका; जात पडताळणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

रियान पराग याच्याकडे पुन्हा ऑरेंज कॅप

राजस्थानच्या पहिल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यानंतर मैदानात उतरलेले रियान पराग आणि संजू सॅमसन यांनी शेवटच्या १० षटकांत १२३ धावा केल्या. गेल्या सामन्यात शतक ठोकणारा जोस बटलर अवघ्या आठ धावांवर बाद झाला. तर, यशस्वी जयस्वालही चांगली खेळी करू शकला नाही. तर, रियान पराग याने ४८ चेंडूंत ७६ धावा करून ऑरेंज कॅप पुन्हा पटकावली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा