23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषशुभमन गिल याला डेंग्यूची लागण

शुभमन गिल याला डेंग्यूची लागण

भारताच्या संघाला सलामीच्या सामन्याआधीच झटका

Google News Follow

Related

भारतीय संघाचा क्रिकेटपटू शुभमन गिल याला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता कमी आहे. संघ व्यवस्थापन शुक्रवारी काही तपासण्या करून शुभमन गिल खेळू शकेल की नाही, याबाबत निर्णय घेतील. मात्र भारताचा आघाडीचा फलंदाज असणारा शुभमन गिल आजारी पडल्याने भारताला हा मोठा धक्का मानला जात आहे. बीसीसीआयचे आरोग्य पथक त्याच्या आरोग्याकडे बारकाईने निरीक्षण करत आहे.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी रंगणार आहे. त्यामुळे या सलामीच्याच सामन्यात शुभमन गिल न खेळण्याची शक्यता अधिक आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये भारतीय संघाने गुरुवारी केलेल्या नेट सरावादरम्यान शुभमन गिल सहभागी झाला नव्हता. त्यानंतर त्याची डेंग्यूची चाचणी घेण्यात आली. त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. शुक्रवारी आणखी एक चाचणी घेण्यात येईल. त्यानंतरच शुभमनचा संघात समावेश होईल की नाही, यावर शिक्कामोर्तब होईल.

शुभमन गिल याने वर्षाच्या सुरुवातीलाच न्यूझीलंडविरोधात द्विशतक ठोकले होते. वेस्ट इंडिजविरोधात वाईट कामगिरीकडे दुर्लक्ष केल्यास त्याने चांगली फलंदाजी केली आहे. नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये त्यांनी २०३ धावा केल्या. इंडियन प्रीमिअर लीग २०२३मध्ये त्याने ८०९ धावा केल्याने तो या हंगामातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता.

हे ही वाचा:

आशियाई स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाची अंतिम फेरीत धडक

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही

खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या धाकट्या भावाला समन्स

ईशान किशनला संधी?

शुभमन गिल रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात न खेळू शकल्यास ईशान किशन याला रोहित शर्माच्या साथीने सलामीचा फलंदाज म्हणून मैदानावर उतरवले जाऊ शकते. केएल राहुलचेही नाव चर्चेत आहे. आशिया कपमध्ये पुनरागमन केल्यापासून तो चांगल्याच फॉर्ममध्ये आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा