नुकताच आयसीसी कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघांमध्ये पार पडला. ऑस्ट्रेलियाने भारतावर दणदणीत विजय मिळवत अजिंक्यपदावर नाव कोरले. त्यानंतर भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल याच्या अडचणीत मात्र वाढ झाली आहे.
दुसऱ्या सत्रात शुभमन गिल स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये झेल देऊन बाद झाला होता. मात्र, शुभमनचा कॅमरून ग्रीनने घेतलेला हा झेल वादाच्या भोवऱ्यात अडकला. निर्णय तिसऱ्या पंचांकडेही गेला होता. मात्र, तिसऱ्या पंचांनी शुभमनला बाद ठरवल्यामुळे हा निर्णय वादग्रस्त ठरला. सोशल मीडियावर याच्या प्रतिक्रिया उमटत असतानाचं शुभमन गिलने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यात तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
शुभमन गिलने ग्रीन झेल पकडताना चेंडू खाली जमिनीला टेकल्याचा फोटो ट्विट केला. मात्र, आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्ट नियम क्रमांक २.७ नुसार खेळाडू किंवा सपोर्ट् स्टाफची सोशल मीडिया पोस्ट ही आयसीसी कोड ऑफ कंडक्टच्या उल्लंघनाच्या कक्षेत येते. शुभमन गिलला मॅच फीच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
हे ही वाचा:
‘संस्कारी, देशप्रेमी, सुदृढ बाळ हवंय, मग रामायण वाचा’
मुंबईत पावसाची हजेरी, राज्यात येलो अलर्ट जारी
बॅडमिंटन खेळल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने खेळाडूचे निधन
फॉर्च्युनर गाडीच्या शर्यतीच्या नादात दांपत्याचा गेला जीव, मुलगा गंभीर जखमी
‘तीन ते चारवेळा फुटेज पाहिलं आणि त्यांनी निर्णय पक्का केला. हा निर्णय खूप लवकर घेण्यात आला. ज्या पद्धतीने हा झेल घेण्यात आला ते पाहता तुम्ही १०० टक्क्यापेक्षा जास्त खात्री झाल्याशिवाय निर्णय देऊ नये. हा फायनल सामना होता,’ अशी प्रतिक्रिया कर्णधार रोहित शर्माने सामना झाल्यावर पत्रकारांनी शुभमन गिलला वादग्रस्तरित्या बाद देण्याबाबत प्रश्न विचारल्यावर दिली.