शुभमन गिल रुग्णालयात दाखल; अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्याला मुकणार

चेन्नईतील रुग्णालयात उपचार सुरू

शुभमन गिल रुग्णालयात दाखल; अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्याला मुकणार

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल याला ऐन विश्वचषक स्पर्धेच्या वेळी डेंग्यू झाल्याने संघाला मोठा धक्का बसला होता. तब्येतीच्या कारणामुळे शुभमन विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला सामना खेळू शकला नाही. त्यानंतर तो पुढील सामन्यांसाठी उपलब्ध असेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, आता त्याच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भारतीय संघाची आणि चाहत्यांची चिंता वाढली आहे. शिवाय त्याच्या खेळाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुभमन गिल याला गेल्या आठवड्यात डेंग्यूची लागण झाली होती. त्यानंतर त्याची तब्येत बिघडल्याने त्याला आता रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. प्लेटलेट्स कमी झाल्याने शुभमन गिलला चेन्नईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बीसीसीआयने मंगळवार, १० ऑक्टोबर रोजी शुभमन गिलचे हेल्थ अपडेट जारी केले आहे. त्यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, शुभमन गिल हा भारतीय संघासोबत दिल्लीसाठी रवाना झालेला नसून चेन्नईमध्येच उपचार घेत आहे. शुभमन गिलचे प्लेटलेट्स कमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

मुंबईत मनसेचे टोलनाका आंदोलन पेटले; नवघर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे

‘गडकरी’ सिनेमाचा जबरदस्त टिझर प्रदर्शित

भारतातील अमली पदार्थांच्या व्यापाराचे धागेदोरे पाकच्या ‘डी’ गँगपर्यंत

सॉफ्टवेअर हॅक करून लुटलेल्या २५ कोटींच्या गुन्ह्याची उकल करताना आढळला १६ हजार कोटींचा घोटाळा

प्रकृतीच्या कारणामुळे शुभमन गिल अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यातून बाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय त्याच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात वापसीची शक्यताही फार कमी असल्याचे वर्तविण्यात येत आहे. शुभमन गिल हा युवा खेळाडू यंदा चांगलाच फॉर्ममध्ये होता. यावर्षी भारतासाठी वनडेमध्ये शुभमन याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे शुभमन गिलच्या अनुपस्थितीचा परिणाम भारतीय संघावर दिसून येत आहे.

Exit mobile version