गुजरात टायटन्सला चेन्नई सुपर किंग्जकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ६३ धावांनी धुव्वा उडवला. सामन्यातील पराभवानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला दुहेरी झटका बसला आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांना वेळेत षटक पूर्ण करता आले नाही. त्यामुळे गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यानंतर आयपीएलने एक निवेदन जारी केले. आयपीएलच्या किमान ओव्हर रेटसंदर्भात शुभमन गिलला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात चेन्नईने गुजरातचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे सामन्यातील पराभाव आणि दंड असा डबल झटका शुभमन गिलला बसलेला आहे.
गुणतालिकेत गुजरात टायटन्स कुठे?
आतापर्यंत गुजरात टायटन्सने २ सामने खेळले आहेत. दोन सामन्यात एक पराभव आणि एक विजय त्यांच्या पदरात पडले आहे. एका विजयामुळे गुजरात टायटन्सचे २ गुण झालेले आहेत. गुजरात संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा ६ धावांनी पराभव केला होता. गिलने मुंबई इंडियन्सविरुद्ध २२ चेंडूत ३१ धावा केल्या होत्या, तर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शुभमन गिलने ५ चेंडूत ८ धावांचे योगदान दिले.
हेही वाचा :
वंचितचा महाविकास आघाडीला डच्चू; ‘एकला चलो’चा नारा देत उमेदवार घोषित
ठाकरे गटाकडून खैरे यांना उमेदवारी दानवेंना तिकीट नाही
वॉशिंग मशिनमध्ये नोटांची थप्पी; ईडीने छाप्यात जप्त केले २.५४ कोटी रुपये
तर आता गुजरात टायटन्स आपला तिसरा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात ३१ मार्च रोजी सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.