27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषआज 'शुभ'मन दिवस, केली डबल सेंच्युरी

आज ‘शुभ’मन दिवस, केली डबल सेंच्युरी

सचिन, वीरेंद्र, रोहितच्या पंक्तीत मिळवले स्थान

Google News Follow

Related

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय सलामीवीर शुभमन गिलने तुफान फटकेबाजी केली आहे. एका टोकाला फलंदाज एकामागोमाग तंबूत परतत असताना एक बाजू लावून धरत गिलने आक्रमक द्विशतक झळकावले. या युवा खेळाडूने सलग तीन गगनचुंबी षटकार लगावत आपले द्विशतक पूर्ण केले. या तडाखेबंद खेळीमुळे भारतीय संघाने ८ बाद ३४९ धावा चोपून काढल्या.

एकीकडे भारतीय फलंदाज हाराकीरी करत असताना शुभमन गिलच्या बॅटने धावांचा पाऊस पाडला. त्याने पहिल्या ५२ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकार मारत अर्धशतक पूर्ण केले. यानंतर त्याने ८७ चेंडूंचा सामना करत १४ चौकार, २ षटकार मारत शतक पूर्ण केले. गिलचे हे वनडेतील सलग दुसरे आणि कारकिर्दीतील तिसरे शतक ठरले.

हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधारासह शुभमन गिलने संघाला एक भक्कम सुरुवात करून दिली. रोहित ३४ धावा करून बाद झाला. त्यानंतर मागील सामन्याचा शतकवीर विराट कोहली मिचेल सँटनरच्या एका शानदार चेंडूवर बाद झाला. इशान किशनही फार चमक दाखवू शकला नाही. तो अवघ्या ५ धावा केल्यानंतर माघारी परतला.

हेही वाचा :

सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियातून काँग्रेसचा ‘हात’ हटवला

गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकारांचे कान टोचले!

दाव्होसमध्ये १ लाख ३७ हजार कोटींचे करार

शतक झाल्यानंतर गिलने आपले गिअर चेंज करून न्यूझीलंडच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करायला सुरुवात केली. प्रथम १२२ चेंडूत १५० धावा पूर्ण केल्या आणि नंतर शेवटच्या षटकापर्यंत पोहोचत सलग ३ षटकार ठोकत १४५ चेंडूत १९ चौकार आणि ८ षटकार मारत द्विशतक पूर्ण केले. शुभमन गिलने अवघ्या १९व्या वनडे डावात द्विशतक झळकावले आहे.

भारताचे दिग्गज सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा, ईशान किशन यांनीही द्विशतके झळकावली आहेत. आता या पंक्तित शुमन गिलने मोठ्या थाटात स्थान मिळविले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा