गुजरातला शुभमन शकून! तिसरे शतक, ८५१ धावा

गुजरातला शुभमन शकून! तिसरे शतक, ८५१ धावा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्ससमोर कोणता संघ असेल याचे उत्तर शुक्रवारी रात्री मिळाले. गुजरात टायटन्सचा तडाखेबंद फलंदाज शुभमन गिल शुभ संकेत घेऊन आला. त्याने केलेल्या आयपीएलमधील तिसऱ्या शतकामुळे गुजरातला मुंबई इंडियन्ससारख्या तगड्या संघाला नमवता आले. या आयपीएलमध्ये गिल हा खूप प्रभावी ठरला. त्याने तीन शतके ठोकली.

हैदराबादविरुद्ध १०१, बेंगळुरूविरुद्ध नाबाद १०४ आणि मुंबईविरुद्ध १२९ ही त्याची खेळी गुजरातला यश मिळवून देणारी ठरली. शुभमनने या हंगामात सर्वाधिक ८५१ धावा केल्या आहेत. याआधी विराट कोहली ९७३ (२०१६) आणि जोस बटलर ८६३ यांनी ही कामगिरी केली आहे. याच विराट आणि जोस बटलर यांनी एका हंगामात ४ शतके ठोकली शुभमनच्या नावावर ३ शतके आहेत.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक हरून पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या गुजरात संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांनी मिळून ६.२ षटकांत ५४ धावांची भागिदारी रचली. स्पिनर पियुष चावला याने साहा याला बाद करून ही जोडी फोडली. साहाने तीन चौकारांसह १८ धावा केल्या. त्यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यानतर गिलने ३२ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर गिलने षटकारांची आतषबाजी केली.

हे ही वाचा:

एनआयएने केली यासिन मलिकच्या फाशीची मागणी

संजय राऊत यांनी कबूल केले आम्ही थकलो!

मंदिर हे पर्यटन स्थळ, म्युझियम नाही

राऊत यांची विधाने म्हणजे विरोधकांनी मोदींपुढे हात टेकल्याचा पुरावा!

गिलने आकाश मढवालच्या एका षटकात तीन षटकार लगावले. तर, १३व्या षटकांत दोन षटकार आणि एक चौकार मारला. गिलने अवघ्या ४९ चेंडूंमध्ये शतकाला गवसणी घातली. त्यामध्ये आठ षटकार आणि चार चौकार आहेत. यंदाच्या आयपीएलमधले शुभमनचे हे तिसरे शतक आहे. सेहवागचा विक्रम तोडला शुभमन गिल याने ६० चेंडूंमध्ये १२९ धावा केल्या. आकाश मधवालच्या गोलंदाजीवर टीम टेव्हिडला झेल देऊन गिल बाद झाला. ही शानदार खेळी करून गिल याने सेहवागचा विक्रम मोडला. आतापर्यंत आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम विरेंद्र सेहवागच्या नावावर होता. सेहवागने चेन्नईविरोधात १२२ धावा केल्या होत्या.

गुजरातने मुंबईला ६२ धावांनी पराभूत करून आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत गुजरातचा सामना चेन्नईची होईल. गुजरातच्या विजयाचा शिल्पकार ठरला शुभमन गिल. त्याने १२९ धावांची धडाकेबाज खेळी केली. तर, गोलंदाज मोहित शर्माने मुंबईचे पाच गडी बाद केले. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात गुजरातने पाचवेळा आयपीएल विजेत्या ठरलेल्या मुंबईवर ६२ धावांनी मात केली. मुंबईला गुजरातने २६२ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र त्यांचा संपूर्ण संघ १८.२ षटकांत १७१ धावांवरच गुंडाळला गेला.

आता, रविवारी २८ मे रोजी गुजरातचा सामना चेन्नईशी होईल. मुंबईकडून सूर्यकुमार यादव याने ३८चेंडूंमध्ये ६१ धावांची खेळी केली. त्यामध्ये सात चौकार आणि दोन षटकार होते. तर, तिलक वर्मा याने पाच चौकार आणि तीन षटकारांसह १४ चेंडूंमध्ये ४३ धावा तडकावल्या. कॅमरन ग्रीन याने ३० धावा केल्या. बाकीचे फलंदाज फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. गुजरातचा जलदगती गोलंदाज मोहित शर्मा याने २.२ षटकांत १० धावा देऊन पाच बळी घेतले. तर, मोहम्मद शामी आणि राशिद खान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. पावसामुळे हा सामना उशिरा सुरू झाला.   शुभमन गिलची कामगिरी नाबाद ९४ – लखनऊ सुपर जायन्ट्स ६ – मुंबई इंडियन्स १०१ – हैदराबाद नाबाद १०४ – बेंगळुरू ४२ – चेन्नई १२९ – मुंबई इंडियन्स

Exit mobile version