तुमच्या मुलासाठी दोन आमदारांचा बळी दिला त्याचे काय?

श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

तुमच्या मुलासाठी दोन आमदारांचा बळी दिला त्याचे काय?

घराणेशाहीवरून सध्या बरीच चर्चा होत असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना खासदारकी मिळाली यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली. त्याला श्रीकांत शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

श्रीकांत शिंदे म्हणाले की, २०१४मध्ये तत्कालिन खासदाराने कल्याणमध्ये राजीनामा दिला होता. शिवसेनेला त्यावेळी उमेदवार मिळत नव्हता. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुलाला उमेदवारी दिली.

ते म्हणाले की, कल्याणमधील शिवसेनेचा खासदार सोडून गेला तेव्हा प्रश्न निर्माण झाला होता की, ती जागा कशी निवडून येईल. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही विचार न करता मला उभे केले. कठीण परिस्थितीत निवडणूक लढलो. आपल्या घरातल्याच कुणाला तरी उभे करावे लागेल आणि प्रचारासाठी ताकद लावावी लागेल, असा विचार शिंदे यांनी केला होता.

श्रीकांत शिंदे म्हणाले की, ती निवडणूक मी अडीच लाखांच्या फरकाने जिंकलो. २०१९च्या निवडणुकीत तर साडेतीन लाखांच्या फरकाने लोकांनी निवडून दिले. ही घराणेशाही नाही. विपरित परिस्थिती असताना आम्ही पक्षासाठी उभे राहिलो आणि निवडून आलो. पक्षाला जेव्हा गरज होती, तेव्हा आम्ही धावून गेलो.

हे ही वाचा:

मालदीवच्या अध्यक्षांनी तोडले अकलेचे तारे!

‘आरआरआर’ फेम अभिनेता रामचरण राम मंदिरासाठी सपत्निक आमंत्रित

इंडी आघाडीच्या संयोजकपदासाठी खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव

भारतातील सर्वात लांब सागरी सेतूबद्दल हे तुम्हाला माहिती आहे का?

 

श्रीकांत शिंदे यांनी वरळीच्या निवडणुकीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, घराणेशाहीवर बोलायचेच झाले तर वरळीतल्या जागेवर आदित्य ठाकरेंना निवडून येण्यासाठी दोन सीटिंग आमदारांचा बळी घेतला. ते दोघेही जिंकून आले असते. स्वतःचा मुलगा निवडून येण्यासाठी दोघांसोबत तडजोड केली. मुलगा निवडून येण्यासाठी त्याच मतदारसंघातील खासदाराला केंद्रीत मंत्रिपद दिले. दोन आमदारांनी विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्याजागी एखाद्या कार्यकर्त्याला संधी देता आली असती.

सगळी पदे घरातच हवीत. पक्षप्रमुख घरात, युवासेनाप्रमुख घरात, आजुबाजूचे नातेवाईक पण घरी.आमच्या पक्षात या गोष्टी नाहीत. मला ते कोणतेही प्रमुखपद देणार नाहीत आणि मी स्वीकारणार नाही. आमचा पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. राहुल शेवाळे लोकसभेत नेतृत्व करत आहेत तर श्रीरंग बारणे पीठासीन अधिकारी झाले.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदेंवर घराणेशाहीचा आरोप करत आपल्या मुलाला खासदारकीचे तिकीट दिल्याचा आरोप केला होता.

Exit mobile version