श्रीकांत शिंदेंनी स्वतः गायली हनुमान चालीसा!

यापूर्वी विरोधी पक्षाच्या खासदाराने दिलेल्या आव्हानावर थेट लोकसभेत हनुमान चालिसा म्हटल्याने श्रीकांत शिंदे चर्चेत होते

श्रीकांत शिंदेंनी स्वतः गायली हनुमान चालीसा!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रचाराला वेग आलेला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. हनुमान जयंतीच्या निमित्ताने त्यांनी स्वतःच्या स्वरात ध्वनिमुद्रित केलेली आणि चित्रीत केलेली हनुमान चालिसा प्रकाशित केली आहे. यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. यापूर्वी हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून श्रीकांत शिंदे हे चर्चेत आले होते.

लोकसभेच्या अधिवेशन काळात एका चर्चेत बोलत असताना विरोधी पक्षाच्या खासदाराने दिलेल्या आव्हानावर थेट लोकसभेत हनुमान चालिसा म्हटल्याने श्रीकांत शिंदे चर्चेत आले होते. त्यानंतर मंगळवार, २३ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या निमित्ताने श्रीकांत शिंदे यांनी थेट स्वतःच्या स्वरात ध्वनिमुद्रित केलेली आणि चित्रीत केलेली हनुमान चालिसा थेट प्रकाशित केली आहे.

हे ही वाचा:

कर्नाटकमधील काँग्रेस नेत्याचा दावा; मुलीची हत्या ही ‘केरळ स्टोरी’ प्रमाणेचं!

‘काँग्रेसच्या काळात हनुमान चालीसा ऐकणे सुद्धा गुन्हा’

न्यायालयाची नवी अट; पतंजलीच्या जाहिरातीएवढीच जाहिरात देऊन माफी मागा!

सलमान खान गोळीबार प्रकरणातील दुसरी पिस्तुल सापडली !

यात श्रीकांत शिंदे हे स्वतः गात असून हनुमानाची पूजा करतानाही दिसत आहेत. मंगळवारी सकाळी हनुमान जयंतीच्या निमित्ताने खासदार श्रीकांत शिंदे यांनी या हनुमान चालिसेची चित्रफीत आपल्या समाजमाध्यम खात्यावरून प्रसारीत केली. यात श्रीकांत शिंदे स्वतः हनुमानाच्या मूर्तीसमोर हनुमान चालिसा गाताना दिसत आहेत. यानंतर मात्र, श्रीकांत शिंदे यांचे कौतुक होत असून सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरला आहे.

यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये संसदेच्या अधिवेशनात अविश्वास ठरावावर बोलताना श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना म्हटले होते की, महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. त्यांना अटक केली जात होती. त्याचवेळी तेथे बसलेल्या खासदार डिंपल यादव यांनी तुम्हाला हनुमान चालिसा येते का? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी थेट हनुमान चालिसाच सभागृहात बोलून दाखवली होती. त्यावेळी भाजपासह सर्व सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी त्यांना समर्थन दिले होते.

Exit mobile version