दुखापतीतून सावरल्यानंतर पुन्हा मैदानावर उतरलेल्या क्रिकेटपटू श्रेयस अय्यर याने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकले. त्यानंतर त्याने दुखापतीतून सावरेपर्यंतच्या कालावधीत त्यांच्या मनात चाललेल्या भावनांच्या चढउतारांना वाट मोकळी करून दिली. दुखापत झाल्यानंतर त्याला एकटेपणाने ग्रासले होते, अशी कबुली त्याने दिली.
रविवारी श्रेयसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तडाखेबंद खेळी केली. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याचे हे पहिलेच शतक. त्याच्या शतकाच्या जोरावर भारताने ३९९ धावांवर मजल मारली. यामध्ये अय्यरच्या वैयक्तिक धावा होत्या, ९० चेंडूंमध्ये १०५. त्यामध्ये ११ षटकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त्याने शुभमन गिलसोबत रचलेल्या भागीदारीमुळे भारताने ऑस्ट्रेलियासमोर धावांचा डोंगर रचला. दोघांनाही २०० धावांची भागीदारी रचली. गिलनेही १०४ धावा ठोकल्या.
श्रेयसचा पुनरागमनाचा प्रवास सोपा खचितच नव्हता. लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला सहा महिने विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. आशिया कपसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती. मात्र त्याचे पाठीचे दुखणे बळावल्यामुळे त्याला पाकिस्तानविरुद्ध खेळता आले नाही. त्यामुळे त्याला स्पर्धेतील अन्य सामन्यांनाही मुकावे लागले.
हे ही वाचा:
भारतीय वायुदलात ‘सी-२९५’ वाहतूक विमान दाखल!
पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त !
किरीट सोमय्यांना कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
नरेंद्र मोदींनी बाईक बंद करायला सांगितली तरच करणार!
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर प्रसारमाध्यमांना सामोरे जाताना श्रेयसने दुखापतीनंतरच्या त्याच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘तो काळ भावनांच्या चढउताराचा होता. मात्र मला माझ्या क्षमतेबद्दल पूर्ण विश्वास होता. मला त्या वेळी खूप एकटेपणाने ग्रासले होते. मात्र त्या कठीण काळात मला माझे कुटुंब, प्रशिक्षक, फिझिओथेरपिस्ट यांनी माझा आत्मविश्वास टिकून राहील, याची पुरेपूर काळजी घेतली. ते सर्व कठीण क्षणी माझ्यासोबत होते. मी नेहमी सकारात्मक राहावे यासाठी ते सातत्याने मला प्रोत्साहन देत होते,’ असे श्रेयस सांगतो.