आशिया कपमध्ये बुमराह, श्रेयस अय्यर खेळण्याची शक्यता

शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर संघात परतण्याचा मार्ग झाला मोकळा

आशिया कपमध्ये बुमराह, श्रेयस अय्यर खेळण्याची शक्यता

भारताचा आघाडीचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त होऊन ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप २०२३मध्ये भारतीय संघात परतण्याची शक्यता आहे. दोघांच्याही पाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून ते सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील (एनसीए) शिबिरात आहेत. आशिया कप स्पर्धेपर्यंत हे दोघे पूर्णपणे तंदुरुस्त होतील, अशी आशा एनसीएच्या वैद्यकीय पथकाने व्यक्त केली आहे.

बुमराह याच्यावर मार्च महिन्यात न्यूझिलंडमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. मात्र गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात टी-२० सामना खेळल्यानंतर तो मैदानावर उतरू शकला नाही. बुमराह यांच्यावर फिजिओथेरपी सुरू आहे. हल्लीच त्यांनी गोलंदाजीचा सराव करण्यासही सुरुवात केली आहे. हा सराव हळूहळू थोडा थोडा वाढवला जाईल.

हे ही वाचा:

मणिपूरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, केंद्रीय मंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकला

पाकिस्तानमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना ५० हजार फुटांवरून टिपणार

गुजरातला ‘बिपरजॉय’चा तडाखा! वादळाने घेतला पिता-पुत्रांचा प्राण

मकोका लागलेल्या गँगस्टरशी राऊत बंधूंची सलगी कशी?

श्रेयसचे पाठीचे दुखणे बळावल्यामुळे त्याला मार्चमध्ये अहमदाबादमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा अंतिम सामना अर्धवटच सोडून द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी मे मध्ये लंडनमध्ये शस्त्रक्रिया केली आणि आता त्यांच्यावर फिजिओथेरपीचे उपचार सुरू आहेत. त्यामुळे दोघेही आयपीएल २०२३ आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळू शकले नाहीत.

आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर झाले. त्यानुसार पाकिस्तान आणि श्रीलंकेत या स्पर्धेतील सामने खेळविले जाणार आहेत. पाकिस्तानात चार सामने खेळविले जाणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडेही लोकांचे लक्ष असेल. आशियाई क्रिकेट कौन्सिलने या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले होते.

Exit mobile version