‘श्री समर्थ’ च्या सुवर्णमहोत्सवी क्रीडा प्रशिक्षण शिबीराला दमदार प्रतिसाद

मुलांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग

‘श्री समर्थ’ च्या सुवर्णमहोत्सवी क्रीडा प्रशिक्षण शिबीराला दमदार प्रतिसाद

श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर, ही संस्था व्यायाम व शारीरिक शिक्षण क्षेत्रात गेली ९९ वर्षे अहर्निष कार्यरत आहे. पद्मश्री उदय देशपांडे, प्रमुख प्रशिक्षक आणि प्रमुख कार्यवाह यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेच्या वतीने यंदा १७ ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत “५० वे समर्थ वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर”; छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, येथे आयोजित करण्यात आले होते. हे भारतातील सातत्याने चालविलेले सर्वात जुने व सर्वात मोठे शिबीर म्हणून ओळखले जाते. ५ ते ७५ वर्षे या वयोगटातील १२०८ शिबिरार्थीनी या शिबिरात सहभाग घेतला होता. संस्थेतील २०० हून अधिक राज्य व राष्ट्रीय दर्जाचे निष्णात खेळाडू यांनी शिबिरात रोज सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ५ ते ७ या वेळात शिबिरार्थींना विविध खेळांच्या मुलभूत कुवतींचे प्रशिक्षण देण्यात आले. शिबिराच्या प्रत्येक सत्रानंतर सर्व शिबिरार्थींना व प्रशिक्षकांना संस्थेतर्फे पौष्टिक खुराक देण्यात आला.

शिबिराच्या रोजच्या ध्वजारोहण व ध्वजावतरण समारंभासाठी समाजातील नामवंत मान्यवरांना पाचारण करण्यात आले व त्यांच्या कार्याचा परिचय शिबिरार्थींना देण्यात आला.

शिबिराचे उद्घाटन समारंभ, बुधवार १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळात पार पडला. उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून ‘डॉ. झहीर काझी’ आले होते. तसेच शिबिराचा समारोप समारंभ, शुक्रवार २६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळात पार पडला. या प्रसंगी शिबिरातील विधर्थ्यांनी विविध खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. समारोपास प्रमुख पाहुणे म्हणून अफगाणिस्थान कॉन्सुलेट जनरल ‘श्रीमती झाकिया वर्डक’ या उपस्थित होत्या. त्याचसोबत सर्व शिबिरार्थी, त्यांचे पालक व सुमारे ५० खास निमंत्रित असा भव्य क्रीडाप्रेमी समुदाय त्यावेळेस उपस्थित होते.

खालील शिबिरार्थी व शिक्षकांना उत्कृष्ट शिबिरार्थी/ प्रशिक्षकाची परितोषिके देण्यात आली.

मुली : राजश्री उटकर, शर्वरी नकाशे, सारा सवे, ईश्वरी दाभिलकर, ओवी मोघे, स्वरांगी गोठणकर, श्रीशा शिंदे

मुले: ओम मेहता, आर्य चिमण, विघ्नेश खानविलकर, युगंध पुरागिरी, प्रीतेश जाधव, हेतांश शाह, तनुष पाटील

 

उत्कृष्ट प्रशिक्षक

सोनम शेलार (लहान गट)
विराज तुपलोंडे (लहान गट)
तेजल मुसळे (मोठा गट)
सर्वज्ञ बने (मोठा गट)

उत्कृष्ट दैनंदिनी- अपर्णा साळगावकर
उत्कृष्ट कार्यकर्ता- साहिल घरत

Exit mobile version