केंद्रीय गृहमंत्रालय प्रशासनात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले सह सचिव श्रीप्रकाश पांडे यांनी नुकतीच मुंबई भेटीत न्यूज डंका आणि कारुळकर प्रतिष्ठानच्या कार्यालयाला खास भेट दिली. कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर, उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांच्या हस्ते त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले.
श्रीप्रकाश पांडे हे केंद्रीय सचिव सेवेचे (सीएसएस) सदस्य असून गृहमंत्रालयात त्यांच्याकडे सहसचिवपदाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत काम करण्याचा दांडगा अनुभव त्यांच्यापाशी आहे. त्यामुळे त्यांनी कारुळकर प्रतिष्ठानला दिलेल्या भेटीदरम्यान त्यांच्याकडून हे अनुभवकथन ऐकता आले.
श्रीप्रकाश पांडे हे न्यायपालिका, प्रशासन, मनुष्यबळ विकास, नियुक्त्या या क्षेत्रातले जाणकार आहेत. केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयात त्यांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे काश्मीरमधील ३७० कलम हटविण्याच्या निर्णयात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. निर्भया प्रकरणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या १४ विविध विभागांच्या कामावर ते बारीक लक्ष ठेवतात.
हे ही वाचा:
अमरावतीत झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जण दगावले
उद्धव ठाकरेंना दोन जागा दिल्या तरी ते घेतील!
भारताचा ऑलिम्पिक सुवर्णवीर नीरज चोप्रा भालाफेकीत जगात पहिल्यांदा ठरला अव्वल
अमरावतीत झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जण दगावले
श्रीप्रकाश पांडे यांनी न्यूज डंकाच्या कामाची माहितीही यावेळी करून घेतली. तसेच कारुळकर प्रतिष्ठान, न्यूज डंका यांच्या वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या. श्रीप्रकाश पांडे यांना कारुळकर प्रतिष्ठानच्या वतीने शाल श्रीफळ, मानचिन्ह आणि आचार्य बाळाराव सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेले चार खंड देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टीही उपस्थित होते. श्रीप्रकाश पांडे यांच्यासारख्या केंद्रातील प्रशासनातील एका महत्त्वाच्या व्यक्तीचा सहवास लाभल्यामुळे आपल्याला खूप समाधान वाटल्याची भावना प्रशांत कारुळकर यांनी व्यक्त केली.