‘सीएनजी’चा तुटवड्यामुळे प्रवाशांचा पंपावर खोळंबा

जोडसुट्ट्यांमुळे सीएनजीचा तुटवडा.

‘सीएनजी’चा तुटवड्यामुळे प्रवाशांचा पंपावर खोळंबा

सलग सुट्यांमुळे मुंबईकरांनी सहलीचे नियोजन केले असतानाच मुंबई महानगरातील गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक सीएनजी पंपावर वाहन चालकांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर अपुरा ‘सीएनजी’ पुरवठा झाल्याने शुक्रवारी टॅक्सी, रिक्षा कमी संख्येने धावत होत्या. सीएनजी भरण्यासाठी वाहनचालकांना पंपावर दीड-दोन तास रांगेत ताटकळत राहावे लागले.

सीएनजीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मुंबईसह ठाणे शहरालगतच्या हद्दीतील अनेक पंप शुक्रवारी बंद होते. तर अन्य पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इंधन नसल्याने काही रिक्षा, टॅक्सी दिवसभरासाठी बंद होत्या. त्यामुळे प्रवाशांनाही अडचण निर्माण झाली. जोड सुट्ट्यांमुळे मुंबईसह ठाण्यातील पर्यटकांनी सहलीचे नियोजन केले होते. मात्र परवडणाऱ्या इंधानापैकी सीएनजी गॅसचा टंचाईमुळे काही जणांच्या उत्साहावर विरजण पडले.

सणासुदीच्या वेळी मुंबई बाहेर जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सीएनजीच्या मागणीत अनपेक्षित वाढ झाल्यामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी गॅस कमी दाबाने भरल्याने वाहन चालकांची नाराजी पाहायला मिळत आहे. मागणी तेवढा पुरवठा करण्यासाठी महानगर गॅस लिमिटेडने काही पावले उचलली आहेत. मुंबई सेन्ट्रल, आग्रीपाडा, भायखळा भागातील पंपावर टॅक्सीच्या रांगा वाढल्याने पोलिसांनी टॅक्सीचालकांना हुसकावण्याचे प्रकारही घडले आहेत. अशी माहिती मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए.एल. क्वाड्रोस यांनी दिली.

हे ही वाचा:

वाहन वितरणाने टाकला टाॅप गिअर

चिनी कट उधळला, व्हीएलसी मीडियावर बंदी

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या

चंदीगडच्या स्टेडियममध्ये ७ हजार विद्यार्थ्यांनी बनवला मानवी तिरंगा

सीएनजी पंप वाढणार…

महानगर गॅस लिमिटेडचे मुंबईत साधारण २९५ सीएनजी पंप आहेत. मात्र पंपावर गॅस भरण्यासाठी कायम रांगा लागत असल्याचे दृश्य दिसते. सध्या चालकांना सीएनजी गॅस भरण्यासाठी साधरण एक ते दीड तास लागतो. हीच वेळ कमी करण्यसाठी नवीन पंप उभारण्यासाठी जागेचा शोध घेतला जात आहे. असे महानगर गॅस लिमिटेड कडून सांगण्यात आले.

Exit mobile version