अयोध्या बलात्कार प्रकरणातील आरोपी समाजवादी पक्षाचे नेते मोईद खान यांच्या मल्टी शॉपिंग कॉम्प्लेक्सवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. अयोध्या विकास प्राधिकरणाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सरकारी जमिनीवर अवैध पद्धतीने बांधण्यात आलेच्या या शॉपिंग कॉम्प्लेक्सवर प्रशासनाने बुलडोजर चालवून जमीनदोस्त केला आहे. याशिवाय मोईद खानचा स्मशानभूमीवरील अवैध कब्जा देखील प्रशासन हटवणार असल्याची माहिती आहे.
सोहावलचे एसडीएम अशोक सैनी यांनी सांगितले की, शासकीय तलावाची ही जमीन आहे, यावर अवैध पद्धतीने मल्टी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यात आले होते. या संदर्भात माहिती समोर येताच कॉम्प्लेक्सवर तोडक कारवाई करण्यास सुरुवात झाली. अयोध्या विकास प्राधिकरणाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. मोईद खान संबंधित अशा अवैध प्रॉपर्टीचा शोध सुरु आहे. अशा प्रकरणांमध्ये बऱ्याच अडचणी येतात, संपूर्ण कागदपत्रे, तपासणी यासाठी बराच वेळ जातो, मात्र कारवाई सुरु आहे. ते पुढे म्हणाले, अशा प्रकारचे अवैध बांधकाम समोर येणार त्याच्यावर कारवाई ही होणारच. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी प्रशासनाकडून अवैध अतिक्रमण काढण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला होता.
हे ही वाचा :
विवाहित महिलेवर बलात्कार करणाऱ्या तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्त्यावर गुन्हा
शाळेमध्येच मुली सुरक्षित नसतील तर, शिक्षण अधिकाराचा उपयोग काय?
मध्य प्रदेशातील पोलिस ठाण्यावर दगड फेकणाऱ्या मोहम्मद हाजीच्या घराची केली ‘दगडमाती’
पाच वर्षांत एमएमआरचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दरम्यान, सपा नेता मोईद खान याच्यावर अल्पवयीन मुलीला नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी मोईद खानने अल्पवयीन मुलीवर दोन महिने बलात्कार केल्याची माहिती आहे. तसेच याबद्दल कोणाला सांगितल्यास आरोपीने मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. आरोपी सध्या तुरुंगात असून फैजाबाद कोर्टात आज (२२ ऑगस्ट) जामिनावर सुनावणी होणार आहे.