27 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषदुकाने उघडल्यामुळे आला व्यापाऱ्यांच्या जीवात जीव

दुकाने उघडल्यामुळे आला व्यापाऱ्यांच्या जीवात जीव

Google News Follow

Related

कोरोना नियमांचे पालन करीत पालिकेकडून राज्यसरकारच्या नियमांनुसार इतर दुकानेही उघडण्यास आता परवानगी मिळालेली आहे. नागरिकांची रखडलेली कामे त्यामुळे मार्गी लागतील असे एकूणच आत्ताचे चित्र आहे. यामुळे आता छोट्या व्यापारी वर्गालाही चांगलाच दिलासा मिळालेला आहे.

एप्रिलपासून दोन महिन्यांच्या बंदीनंतर अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त वस्तूंची विक्री करणारी दुकाने पुन्हा उघडली. स्टेशनरी, पुस्तके, शूज, कपडे आणि छत्र्या यासारख्या खरेदीसाठी नागरिकांनी धाव घेतली. लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने दुकानदार, व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. त्यांनी १ जूनपासून दुकाने उघडू द्या अन्यथा आम्ही दुकाने उघडू असा इशाराही दिला होता.

हे ही वाचा:
गृहमंत्र्यांनी स्वत: अदर पुनावालांना सुरक्षेची हमी द्यावी- न्यायालयाचे निर्देश

परदेशी लशींचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

हार्दिक पाटील यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

सुशांत सिंह राजपूत प्रकरण, ड्रग पेडलर हरीश खानला अटक

माटुंगा, अंधेरी लोखंडवाला, बोरिवली वेस्ट आणि मुलुंड वेस्टमधील व्यापारी वर्गांनी आपले शटर आता उघडले. लोखंडवाला येथील कपड्यांच्या किरकोळ विक्रेत्याने सांगितले की, आम्ही दरमहा दीड लाख ते दोन लाख रुपये भाडे भरतो. २०२० पासून व्यवसायावर खूपच गदा आलेली आहे. अनेकांचे फोन या टाळेबंदीच्या काळात बिघडल्याने त्यांचीही चांगलीच गैरसोय झाली होती. त्यामुळे फोन दुरुस्तीच्या दुकांनावरही गर्दी पाहायला मिळाली. भाजीपाला विक्रेते सुद्धा आता अधिक वेळ बसू शकत असल्याने त्यांच्यातही उत्साह दिसून आला.

हे ही वाचा:

हार्दिक पाटील यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

महापालिकेला लसींसाठी पर्याय केवळ ९ निविदांचाच

पिटावर बंदी घाला- अमूलचे पंतप्रधानांना पत्र

आता कोरोनामुळे मृत झालेल्यांना ४८ तासांत मिळणार ५० लाख

बोरिवली वेस्ट मार्केट असोसिएशनचे सदस्य अंकित जैन म्हणाले की, मंगळवारी सकाळी सर्व व्यवसाय सुरू झाले. ते म्हणाले, “विषम-सम आणि डाव्या-उजव्या संभ्रमातून पोलिसांनी मदत केली. सरकारने योग्य नियोजन केले पाहिजे. अन्यथा केवळ किरकोळ विक्रेते कोलमडून पडतील.” नवीन नियमांनुसार मात्र नवी मुंबई आणि ठाण्यात शनिवार व रविवार रोजी दुकाने बंद ठेवली जातील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा