चीनच्या हँगझाऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने विक्रमी ७४ पदके जिंकली आहेत पण यात सर्वाधिक सुवर्णपदके जिंकली आहेत ती नेमबाजांनी. भारतीय नेमबाजांनी तिन्ही पदके मिळून एकूण २२ पदकांची कमाई केली आहे. त्यात सर्वाधिक सुवर्णपदके आहेत ती ७. त्याखालोखाल ऍथलेटिक्समध्ये भारताला सर्वाधिक सुवर्णपदके मिळाली आहेत.
नेमबाजांनी सात सुवर्णपदकांसह नऊ रौप्य आणि ६ ब्राँझपदके जिंकली आहेत. इतर सुवर्णपदके घोडेस्वारी, स्क्वॉश, सेलिंग, रोइंग, टेनिस, तिरंदाजी, क्रिकेटमधून मिळाली आहेत. नेमबाजांपैकी पिस्तुल नेमबाजी या प्रकारात इशा सिंगने चार पदके जिंकली असून त्यात एक सुवर्ण आणि तीन रौप्य आहेत. ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरनेही चार पदके जिंकली असून त्यात दोन सुवर्णपदके आहेत. एक रौप्य आणि एक ब्राँझपदकही त्याने जिंकले आहेत. रायफल नेमबाज आशी चौकसीने तीन पदके जिंकली आहेत.
हे ही वाचा:
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा अमृतकाल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणाच्या खंडाचे मंत्रालयात प्रकाशन!
२०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आयडिया शरद पवारांचीच
सिक्कीममध्ये ढगफुटी; महापुरात लष्कराचे २३ जवान बेपत्ता
भारतीय नेमबाजांनी जिंकलेली सुवर्णपदके अशी-
१० मीटर एअर पिस्तुल सांघिक – अर्जुन सिंग चीमा, शिवा नरवाल, सरबज्योत सिंग.
१० मीटर एअर रायफल सांघिक पुरुष – दिव्यांग सिंग पँवार, रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील., ऐश्वर्य प्रताप सिंग.
५० मीटर थ्री पोझिशन सांघिक पुरुष –स्वप्नील कुसाळे, अखिल शेवरण, ऐश्वर्य प्रताप सिंग,
१० मीटर एअर पिस्तुल महिला – पलक गुलिया
५० मीटर रायफल थ्री पोझिशन महिला – सिफ्ट कौर शर्मा
२५ मीटर पिस्तुल सांघिक महिला – मनू भाकर, रिदम सांगवान, इशा सिंग.
ट्रॅप सांघिक पुरुष – किनान दारियस चेनाइ, झोरावर सिंग, पृथ्विराज तोंडायमान.
पदकतक्ता
क्रीडा प्रकार सुवर्ण, रौप्य ब्राँझ एकूण
नेमबाजी ७ ९ ६ २२
ऍथलेटिक्स ४ १० ९ २३
टेनिस १ १ ० २
तिरंदाजी १ ० ० १
घोडेस्वारी १ ० १ २
स्क्वॉश १ ० २ ३
क्रिकेट १ ० ० १
रोइंग ० २ ३ ५
सेलिंग ० १ २ ३
बॅडमिंटन ० १ ० १
वुशू ० १ ० १
गोल्फ ० १ ० १
बॉक्सिंग ० १ ४ ५
रोलर स्केटिंग ० ० २ २
टेटे ० ० १ १
कनोइंग ० ० १ १
एकूण १६ २७ ३१ ७४