बाबा सिद्दीकींच्या हत्येपूर्वी सलमान खानच्या हत्येची योजना होती, परंतु…

चौकशी दरम्यान आरोपींकडून धक्कादायक माहिती समोर

बाबा सिद्दीकींच्या हत्येपूर्वी सलमान खानच्या हत्येची योजना होती, परंतु…

दोन महिन्यांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेल्या बाबा सिद्दीकिंच्या हत्येपूर्वी नेमबाजांनी अभिनेता सलमान खानला मारण्याची योजना आखली होती, अशी माहिती आली आहे. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, सूत्रांनी सांगितले की, बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी चौकशीदरम्यान आरोपींनी हा खुलासा केला आहे.

६६ वर्षीय बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. चौकशीदरम्यान, आरोपींनी सांगितले की सलमान खान नेमबाजांच्या हिटलिस्टवर होता, परंतु अभिनेत्याच्या कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे ते त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

१४ एप्रिल रोजी रात्री उशिरा सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी विकी गुप्ता आणि सागर पाल या शूटर्सना नंतर गुजरातमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीने या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती.

हे ही वाचा : 

शपथविधीसाठी खास ‘संत तुकाराम महाराज केशर पगडी’ तयार

पुतीन यांना ‘मेक इन इंडिया’ची भुरळ!

एकनाथ शिंदेंचं माहीत नाही, मी तर शपथ घेणार!

संभल हिंसाचार : ३३ आरोपींची तुरुंगात रवानगी

दरम्यान, अलीकडच्या काही महिन्यांत सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून वारंवार धमक्या येत आहेत. यामुळे सलमान खानला Y+ सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे आणि त्याच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Exit mobile version