आशियाई स्पर्धेत नेमबाजांचा ‘सुवर्ण’वेध

२५ मीटर पिस्तुल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी

आशियाई स्पर्धेत नेमबाजांचा ‘सुवर्ण’वेध

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही भारताकडून चमकदार कामगिरी सुरू आहे. शुटींग खेळात भारताच्या खेळाडूंनी सुवर्णपदकाचा वेध घेतला आहे. नेमबाज मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांनी महिलांच्या २५ मीटर पिस्तुल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या सुवर्णपदकाच्या कमाईनंतर भारताकडे एकूण चार सुवर्णपदकांची नोंद झाली आहे.

मनू भाकर हिने तिच्या तिसर्‍या शॉट्स सिरीजच्या रॅपिड राऊंडमध्ये ९८ शूट केले. यात तिने ५९० गुणांसह अंतिम फेरीत अव्वल स्थान पटकावले. ५८६ गुणांसह ईशा सिंग आणि ५८३ गुणांसह रिदम सांगवानही अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या होत्या. सांघिक स्पर्धेत मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम सांगवान यांनी १ हजार ७५९ गुणांसह सुवर्ण कामगिरी केली. तर चीनच्या खेळाडूंनी १ हजार ७५६ आणि कोरियाच्या संघाकडे १ हजार ७४२ गुण होते

हे ही वाचा:

एनआयएकडून खलिस्तानी- गँगस्टर्स विरोधात कारवाईचा बडगा

नाझी सैनिकाचा गौरव; कॅनडाच्या लोकसभा अध्यक्षाचा राजीनामा

इराकमध्ये लग्नसोहळ्यात लागलेल्या आगीत १०० ठार

गरवारे क्लब निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का

यासह भारताने नेमबाजीचे सातवे आणि एकूण चौथे सुवर्णपदक पटकावले आहे. याआधी दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील, ऐश्वरी प्रताप सिंग तोमर यांच्या संघाने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल गटात विश्वविक्रमी सुवर्णपदक पटकावले होते. तसेच महिलांच्या १० मीटर एअर रायफल संघात मेहुली घोष, रमिता जिंदाल आणि आशी चौकसे यांनी रौप्यपदक मिळवले. रमिताने महिलांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदकही मिळवले. ऐश्वरीने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेतही कांस्यपदक जिंकले होते. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये आदर्श सिंग, विजयवीर सिद्धू आणि अनिश भानवाला या तिघांनीही कांस्यपदक मिळवले.

Exit mobile version