भोपाळ येथे सुरू असलेल्या ६४व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत लक्ष्य नेमबाजी क्लबने दमदार यश संपादन केले. या क्लबच्या अंतर्गत भारताची माजी ऑलिम्पियन सुमा शिरूर हिच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या युवा नेमबाजांनी कमाल करून दाखविली. पुरुषांच्या ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात किरण जाधवने कमाल केली. नीरजकुमारसह त्याने रौप्यपदक विजेती कामगिरी केली. दोघेही नौदलाचे प्रतिनिधित्व करतात.
त्याशिवाय, महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात लक्ष्यच्याच राजश्री संचेती आणि झीना खिट्टा यांनीही कमाल करून दाखविली. झिनाने तर ज्युनियर महिलांच्या स्पर्धेत रौप्यही जिंकले. राजश्रीने सुवर्णपदक तर झिनाने रौप्यपदकविजेती कामगिरी केली. दोघीही लक्ष्य अकादमीत सुमाच्या देखरेखीखाली तयार झालेल्या खेळाडू आहेत.
किरण जाधव हा साताऱ्याचा खेळाडू असून पनवेल कामोठे येथे राहतो आणि कर्नाळा स्पोर्टस अकादमीत असलेल्या लक्ष्य नेमबाजी क्लबचा सदस्य आहे. त्याच्यात असलेली गुणवत्ता सुमाने हेरली आणि २०१७पासून त्याला शिष्यवृत्ती देण्यात आली. २०१९ला किरणने रिओ येथे नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच नेपाळच्या सॅफ गेम्समध्ये रौप्य जिंकले.
हे ही वाचा:
किशोर गट राष्ट्रीय खोखोत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची उपांत्य फेरीत धडक
83 च्या ट्रेलरवर लाखो चाहत्यांच्या उड्या
…म्हणून ट्विटर संस्थापक डॉर्सी यांची पहिली पसंती होती पराग अग्रवाल!
न्यायाधीश चांदीवाल यांनी सचिन वाझे आणि पोलिसांनाही खडसावले
राजश्री ही मूळची दिल्लीची खेळाडू पण सुमाच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्यमध्ये शिकली. दुखापतीतून सावरत तिने लॉकडाउनदरम्यान स्वतःचा खेळ उंचावला आणि प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिथे तिने एका व्यावसायिक खेळाडूप्रमाणे खेळ करून सुवर्ण जिंकले. लक्ष्यमधील तिचे प्रशिक्षक रमेश यांचेही तिच्या कामगिरीत योगदान आहे. झिना ही हिमाचलप्रदेशची खेळाडू. खेलो इंडियात चमक दाखवून ती लक्ष्य अकादमीत आली. राष्ट्रीय स्पर्धेत लक्ष्य अकादमीच्याच दोन खेळाडूंमध्ये ही अंतिम फेरी रंगली आणि त्यात राजश्रीला सुवर्ण तर झिनाला रौप्य मिळाले.