पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज मोनाची कांस्य पदकाची कमाई

एकाच स्पर्धेत भारताच्या खात्यात सुवर्ण आणि कांस्य पदक

पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज मोनाची कांस्य पदकाची कमाई

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत्त भारताने दमदार सुरुवात करत एकाच दिवशी दोन पदकांची कमाई केली आहे. भारताने या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी आपले पदकांचे खाते उघडत एक सुवर्ण पदक तर एक कांस्य पदक आपल्या नावे केले आहे. नेमबाज अवनी लेखरा हिने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे तर, याचं स्पर्धेत मोना अग्रवाल हिने कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे.

नेमबाज मोना अग्रवाल हिने २२८.७ गुण कमावत तिसरे स्थान पटकावले आहे. मोना हिने कांस्य पदकाची कमाई केल्यामुळे एकाचं स्पर्धेत भारताला दोन पदके मिळाली आहेत. तर, सुवर्ण पदकाची कमी करणारी अवनी लखेरा हिने २४९.६ गुणांची कमाई केली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमधील २४९.६ हा रेकॉर्ड तिने मोडित काढत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दुसरीकडे दक्षिण कोरियाच्या युनरी ली हिने २४६.८ गुणांसह रौप्य पदक कमावले आहे.

अवनी लेखराने टोकियो पॅरालिम्पिक २०२० स्पर्धेतही सुवर्ण पदक मिळवलं होतं. आता पुन्हा एकदा तशीच कामगिरी करत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. अवनीने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील ५० मीटर रायफल थ्री पोजिशनमध्ये कांस्य पदकही जिंकलं होतं. अवनी ही महाराष्ट्राची ऑलिंपियन सुमा शिरूर यांची शिष्या आहे. लक्ष्य नेमबाजी अकादमीत तिने प्रशिक्षण घेतले आहे.

हे ही वाचा :

नेमबाज अवनी लेखराला पॅरालिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा सुवर्ण!

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘शिवरायांच्या चरणावर डोके ठेवून माफी मागतो’

आंध्रमधील महाविद्यालयात मुलींच्या वसतिगृहातील वॉशरूममध्ये कॅमेरा; ३०० हून अधिक छायाचित्रे लीक

काँग्रेसच्या भूपेंद्र सिंह हुड्डांवर ईडीची कारवाई, ८३४ कोटींची मालमत्ता जप्त!

राजस्थानच्या सिकर येथे जन्मलेली मोना ही बालपणीच पोलिओमुळे प्रभावित झाली होती. ती पॅरा शूटर होण्यासाठी जयपूरला आली. ३७ वर्षीय पॅरा शूटर मोना अग्रवाल हिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तीन प्रकारच्या स्पर्धेत भाग घेतला आहे. महिला १० मीटर एअर रायफल स्टँडिंग आर २ स्पर्धेत कांस्य पदक पटकवाणीर मोना मिश्र ५० मीटर रायफल प्रोन आर ६ आणि महिला ५० मीटर रायफल ३ पोझीशन आर ८ मध्येही भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

Exit mobile version