27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषनेमबाज अवनी लेखराला पॅरालिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा सुवर्ण!

नेमबाज अवनी लेखराला पॅरालिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा सुवर्ण!

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदकाची केली होती कमाई

Google News Follow

Related

ऑलिम्पिकनंतर आता पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेची रंगत सुरू असून या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने आपल्या पदकाचे खाते उघडले आहे. या स्पर्धेत भारताने आपल्या नावे पहिलं सुवर्णपदकाची नोंद केली आहे. नेमबाज अवनी लेखरा हिने ही ऐतिहासिक कामगिरी करत भारताला यश मिळवून दिलं आहे. तिच्या या सुवर्ण यशामुळे सर्वच स्तरावरून तिचे कौतुक होत आहे.

महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 स्पर्धेत तिने यश मिळवत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेत तिने २४९.७ गुणांची कमाई केली. विशेष म्हणजे या स्पर्धेत कांस्य पदकही भारताच्या नावावर आहे. मोना अग्रवाल हिने २२८.७ गुण मिळवत कांस्य पदकाची कमाई केली. त्यामुळे या स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदक भारताला मिळालं आहे. तर, रौप्य पदक दक्षिण कोरियाच्या युनरी लीच्या नावावर आहे.

अवनी लेखराने यंदाच्या स्पर्धेत २४९.७ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. या दरम्यान तिने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. तिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये २४९.६ गुण मिळवले होते. अवनीने महिलांच्या १० मीटर एअर रायफल (SH1) प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. अंतिम फेरीतील शेवटची संधी असताना अवनी दुसऱ्या स्थानावर होती. अवनी कोरियन युनरी लीपेक्षा ०.८ गुणांनी मागे होती. त्यानंतर तिने शूटिंग रेंजवर १०.५ चा अचूक वेध घेतला आणि अव्वल स्थान पटकावलं.

अवनी लेखराने टोकियो पॅरालिम्पिक २०२० स्पर्धेतही सुवर्ण पदक मिळवलं होतं. आता पुन्हा एकदा तशीच कामगिरी करत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. अवनीने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील ५० मीटर रायफल थ्री पोजिशनमध्ये कांस्य पदकही जिंकलं होतं. अवनी ही महाराष्ट्राची ऑलिंपियन सुमा शिरूर यांची शिष्या आहे. लक्ष्य नेमबाजी अकादमीत तिने प्रशिक्षण घेतले आहे.

हे ही वाचा :

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘शिवरायांच्या चरणावर डोके ठेवून माफी मागतो’

आंध्रमधील महाविद्यालयात मुलींच्या वसतिगृहातील वॉशरूममध्ये कॅमेरा; ३०० हून अधिक छायाचित्रे लीक

काँग्रेसच्या भूपेंद्र सिंह हुड्डांवर ईडीची कारवाई, ८३४ कोटींची मालमत्ता जप्त!

दहा वर्षांत फिनटेक क्षेत्रात ३१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; स्टार्टअपमध्ये ५०० टक्क्यांची वाढ

अवनी लेखरा ही जयपूरची रहिवासी असून ती पॅरा नेमबाज आहे. एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये तिने १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले तर ५० मीटर रायफल थ्री-पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकले. आता पॅरिसमध्ये पदक जिंकल्यामुळे, ती आता सलग २ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला पॅरा ॲथलीट बनली आहे. १२ वर्षांपूर्वी अवनीचा एक भीषण कार अपघात झाला होता ज्यात तिला पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तिच्या शरीराच्या खालचा भाग पॅरालाईझ झाला. मात्र, यातून निराश न होता तिने तिच्या ध्येयाकडील वाटचाल सुरू ठेवली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा