27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषबांगलादेश हिंसाचार; 'दिसताच क्षणी गोळ्या घाला'

बांगलादेश हिंसाचार; ‘दिसताच क्षणी गोळ्या घाला’

सरकारकडून पोलिसांना आदेश

Google News Follow

Related

बांगलादेश सध्या आरक्षणाच्या मुद्यावरून आगीत जळत आहे. देशात सर्वत्र हिंसाचार पसरला आहे. हिंसक संघर्षांमुळे अनेकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. देशात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता तर सरकारने पोलिसांना बदमाशांना ‘दिसताच गोळ्या घालण्याच्या’ सूचना दिल्या आहेत. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावरून आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे.

या हिंसाचारात आतापर्यंत १३३ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती असून दोन हजारहुन अधिक लोक जखमी झाले आहेत. बांगलादेश सरकारने १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धात पाकिस्तानसोबत लढलेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी सरकारी नोकऱ्यांमधील लागू केलेले ३० टक्के आरक्षण रद्द करण्याची मागणीवरून हा हिंसाचार सुरु आहे. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. संपूर्ण बांगलादेशात लागू करण्यात आलेला कडक कर्फ्यू सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. लोकांना आवश्यक कामे चालवता यावीत यासाठी शनिवारी दुपारी कर्फ्यू थोडक्यात उठवण्यात आला होता.

हे ही वाचा..

केदारनाथ पदयात्रा मार्गावर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू !

ग्रँटरोडमधील व्यवसायिकाला बनावट शिल्पे विक्रीकरुन २२ लाखांची फसवणूक

विकास प्रकल्प रद्द करणे हीच उद्धव ठाकरेंची खासियत !

जरांगेंचा भंपकपणा उघड करून त्यांच्यावरच भूत नक्कीच उतरवू !

सत्ताधारी अवामी लीग पक्षाचे सरचिटणीस ओबेदुल कादर यांनी वृत्तसंस्था एएफपीला सांगितले की, कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्यांवर गोळीबार करण्याचे अधिकार पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये सुरू झालेली निदर्शने देशभर पसरली आहेत, पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात अनेक पोलिस अधिकाऱ्यांसह किमान १३३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, वाढता हिंसाचार पाहता बांगलादेशातून जवळपास एक हजार भारतीय विद्यार्थी परतले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा