अभिनेते नसीरुद्दीन शाह एका गंभीर आजारामुळे त्रस्त आहेत. हा आजार त्यांना शांततेत जगू देत नाही अशी धक्कादायक माहिती शाह यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली आहे. ते बऱ्याच दिवसांपासून ओनोमेटोमॅनिया नावाच्या आजाराने त्रस्त आहेत. ओनोमॅटोमॅनिया हा एक असा आजार आहे ज्यात एखादी व्यक्ती एक शब्द, वाक्य किंवा भाषण गरज नसतानाही वारंवार बोलत राहतो.
त्यांनी मुलाखतीत आपली स्थिती सांगताना नसरुद्दीन शाह यांनी आपली व्यथा मांडली आहे. नसीरुद्दीन म्हणाले की, ” हा आजार त्यांना शांततेत जगू देत नाही, ओनोमॅटोमॅनिया हा असा आजार आहे ज्यामध्ये तुम्ही कोणतेही कारण नसताना एखादा शब्द, वाक्प्रचार, वाक्य, कविता किंवा भाषण पुन्हा पुन्हा सांगत राहता. माझ्यासोबत हे प्रत्येक क्षणी घडते, त्यामुळे मी कधीही शांततेत राहू शकत नाही. मी झोपेत असतानाही मला आवडणारे काही गोष्टी सांगत राहतो.”
बऱ्याच दिवसांनंतर नसीरुद्दीन शाह पंकज कपूर यांची मुलगी स्नेहा कपूरच्या लग्नात सहभागी होताना दिसले. सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर यांच्यासोबतही त्यांनी अनेक फोटो काढले, जे सोशल मीडियावर वायरल झाले.
हे ही वाचा:
… म्हणून भारतीय महिलांचं होतंय कौतुक!
आज पंतप्रधान मोदींनी केली युक्रेनच्या अध्यक्षांशी चर्चा
रशिया युक्रेन युद्धामुळे भारतीय रुपया घसरला!
अनिल देशमुख यांच्यासह आर्थर रोड तुरुंगात नवाब मलिकही
नसिरुद्दीन शहा हे वादग्रस्त वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध आहेत. विशेषतःदेशातील मोदी सरकारविरोधात ते भूमिका घेत असतात. त्यावरून त्यांना नेटकऱ्यांचा रोषही सहन करावा लागतो.
नसीरुद्दीन शाह वयाच्या ७१ व्या वर्षीही व्यावसायिक आघाडीवर सक्रिय आहेत. ते दीपिका पदुकोणच्या ‘गेहराइयां’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांनी दीपिका पदुकोणच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांनतर विशाल भारद्वाजच्या ‘कुत्ते’ या आगामी चित्रपटात शाह दिसणार आहेत.