पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त !

केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याप्रकरणी कारवाई

पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त !

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाकडून कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. जीएसटी विभागाने एप्रिल महिन्यातही कारखान्यावर छापेमारीची कारवाई केली होती.त्यानंतर पुन्हा आता कारवाई केल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.

जीएसटी विभागाकडून एप्रिल महिन्यात वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर छापेमारी करून काही कागदपत्रे तपासले होते.यामध्ये असे स्पष्ट झाली की, कारखान्याने १९ कोटी रुपयांचा बेकायदेशीर जीएसटी कर बुडवला आहे.त्यानंतर काल औरंगाबाद येथील जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्यावर धाड टाकत कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.या कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे आहेत.

हे ही वाचा:

कैसमीच्या भारतीय संगीत प्रेमाची पंतप्रधानांनी घेतली दखल

चांद्रयान ३, जी-२० परिषदेने भारताला शिखरावर नेले!

भारताची पहिल्या दिवशी दमदार कामगिरी, ५ पदकांची कमाई

भारताच्या जी-२० अध्यक्षपदाची संयुक्त राष्ट्रांकडून स्तुती !

दरम्यान, केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याप्रकरणी वैद्यनाथ साखर कारखान्याची चौकशी सुरु होती. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला शनिवारी यासंदर्भात नोटीस बजावण्यात आलेली होती. तर कारखान्यातील कोणती मालमत्ता जप्त केली आहे याची माहिती असलेले एक पत्रक जीएसटी विभागाकडून कारखान्याच्या गेटवर लावण्यात आले आहे.लावलेल्या पत्रकानुसार कारखान्याचे बॉयलर हाऊस आणि इतर मशनरी जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर जप्त केलेल्या या मशिनरीचा लिलाव करुन कर वसूल करणार असल्याचे देखील जीएसटी विभागाने म्हंटले आहे.

केंद्रीय जीएसटी आयोगाचे औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने वारंवार वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी कराबाबत नोटीसा दिल्या होत्या. या नोटिशीला प्रत्युत्तर न दिल्याने गेल्या सहा महिन्यांपूर्वी काही अधिकार्‍यांनी या कारखान्याला अचानक भेट देत काही कागदपत्रे हस्तगत केली होती.
या कारखान्याने बेकायदेशीररित्या १९ कोटींचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात कारखान्याचे बॉयलर हाऊस आणि इतर मशिनरी असे मिळून १९ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. या मालत्तेचा लिलाव करून हा कर वसूल करण्यात येणार असल्याचे समजते.

Exit mobile version