पत्नीच्या मृत्यूने बसला धक्का, आसामच्या गृहसचिवानं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या!

आसाम पोलीस दलावर पसरली शोककळा

पत्नीच्या मृत्यूने बसला धक्का, आसामच्या गृहसचिवानं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या!

आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. शिलादित्य चेतिया यांच्या पत्नी कॅन्सरच्या आजराने ग्रस्त होत्या आणि त्यांच्यावर अनेक दिवसांपासून रुग्नालयात उपचार सुरू होते. परंतु, त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आणि मंगळवारी(१८ जून) त्यांचं निधन झालं. पत्नीच्या धक्क्याने शिलादित्य चेतिया यांनी सुद्धा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीच्या मृत्यूनंतर अवघ्या काही मिनिटांतच चेतिया यांनी रुग्णालयात आत्महत्या केल्याचं माहिती मिळत आहे. या घटनेमुळे संपूर्ण आसाम पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) त्यांच्या अधिकृत रिव्हॉल्व्हरनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला, त्याच ठिकाणी चेतिया यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

हे ही वाचा..

कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवाद्याला श्रद्धांजली

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो शोधताहेत भारत संबंधांमध्ये ‘संधी’

ब्रह्मोस क्षेपणास्त्र अभियंता निशांत अग्रवालच्या लॅपटॉपमधून गोपनीय डेटा मिळविण्यासाठी पाकिस्तानी हेरांकडून तीन

ॲप्सचा वापर!

मुख्यमंत्री पिनाराई विजयन, मुलगी वीणा यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाची नोटीस!

आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया हे २००९ च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी होते. त्यांच्या पत्नी ब्रेन ट्युमरनं त्रस्त होत्या आणि त्यांच्यावर दीर्घकाळापासून गुवाहाटी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, अखेर मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूने शिलादित्य चेतिया यांना जबर धक्का बसला आणि हे दुःख सहन न झाल्यामुळे चेतिया यांनी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये त्यांच्या अधिकृत रिव्हॉल्व्हरनं स्वतःवर गोळी झाडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. आसामचे गृहसचिव शिलादित्य चेतिया यांनी पत्नीच्या मृत्यूनंतर रुग्णालयात आत्महत्या केल्यानं आसामसह संपूर्ण देशभरात खळबळ माजली असून संपूर्ण आसाम पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

 

Exit mobile version