हरियाणात काँग्रेसला झटका, सोनीपतचे महापौर निखिल मदान यांचा भाजपात प्रवेश!

मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

हरियाणात काँग्रेसला झटका, सोनीपतचे महापौर निखिल मदान यांचा भाजपात प्रवेश!

हरियाणात काँग्रेसला झटका बसला आहे. सोनीपतचे महापौर निखिल मदान यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील हरियाणा भवन येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री नायबसिंग सैनी, केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल आणि नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली यांच्या उपस्थितीत निखिल मदान यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उदय भान यांच्याकडे त्यांनी राजीनामा पत्र पाठवत भाजपात प्रवेश केला आहे.

काँग्रेस नेते निखिल मदन यांचा भाजपात प्रवेश झाल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी म्हणाले की, काँग्रेसचे माजी नेते निखिल मदान यांनी आज आपल्या सर्व सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मी त्यांच्या सर्वांचे स्वागत करतो. ऑक्टोबर महिन्यात आपण सर्व मिळून हरियाणात तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने भाजपचे सरकार स्थापन करू.

हे ही वाचा:

शंकराचार्यांना राहुल गांधींच्या पालख्या नाचवण्याचे काम उरले आहे का?

बिहारमधील नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयकडून कथित मुख्य सूत्रधाराला अटक

लॉरेन्स बिश्नोई टोळीवर पंजाब पोलिसांची मोठी कारवाई !

इंडी आघाडीच्या नेत्यांची चौकशी करा

दरम्यान, काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या निखिल मदन यांनी २०२० मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली आणि सोनीपतचे पहिले महापौर बनले. त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेता ललित बतरा यांचा पराभव केला होता. अखेर निखिल मदन यांनी कॉग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला आहे.

Exit mobile version