दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने ईडीची याचिका स्वीकारत सुनावणी पूर्ण होईपर्यंत केजरीवाल यांच्या सुटकेला स्थगिती दिली आहे.
राऊस एव्हेन्यू येथील विशेष न्यायालयाच्या सुटी खंडीपीठाने केजरीवाल यांना गुरुवारी (२० जून) संध्याकाळी जामीन मंजूर केला होता. परंतु, पुढील सुनावणीपर्यंत कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता हायकोर्टात सुनावणी होईपर्यंत केजरीवाल तिहार तुरुंगातच राहणार आहेत.
हे ही वाचा:
योग साधनेमुळे समाजात सकारात्मक बदल!
नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी झालेली शिक्षा स्थगित करा!
‘डार्कनेटमधून फुटली होती यूजीसी-नेटची प्रश्नपत्रिका’
राजभवनात सध्याच्या कोलकाता पोलिसांच्या ताफ्यात मी सुरक्षित नाही!
अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाविरोधात ईडीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्याची परवानगी दिली आहे. या खटल्याची सुनावणी होईपर्यंत खालच्या न्यायालयाचा आदेश प्रभावी ठरणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ईडीचा प्राथमिक युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची तात्काळ सुनावणी घेण्यास सांगतले. त्यामुळे सुनावणी पूर्ण होईपर्यंत जामीन आदेशाची अंमलबजावणी रोखण्यात आली आहे.