हिमाचल प्रदेशचे काँग्रेसचे प्रभारी सचिव तजिंदर सिंग बिट्टू यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. बिट्टू हे प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय होते. बिट्टू यांच्या या निर्णयाने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत बिट्टू यांनी प्रवेश केला. कालच कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात बिट्टू यांनी पक्षाचा राजीनामा दिला. या पत्रात त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि हिमाचल प्रदेशचे सह-प्रभारी सचिव पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
बिट्टू यांनी राजीनामा पत्र फेसबुक पोस्टमध्ये शेअर करत त्याला जड अंत:करणाने ३५ वर्षांनंतर मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे., अशी कॅप्शन दिली आहे.
हेही वाचा..
राज्यातील नक्षलग्रस्त मानल्या जाणाऱ्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान
इस्त्रायल- इराणमधील तणावानंतर एअर इंडियाची तेल अवीव दरम्यानची विमानसेवा स्थगित
पत्नीला टॉयलेट क्लिनर मिसळलेले जेवण दिल्याचा इम्रान खान यांचा आरोप
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६२.३७ टक्के मतदान
दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये एका माजी आमदारासह अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भोपाळ येथील प्रदेश भाजप कार्यालयात मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी आमदार हरी वल्लभ शुक्ला यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
मार्चमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते रोहन गुप्ता यांनी पक्षातील काही नेत्यांकडून छळ होत असल्याने राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. अहमदाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवार म्हणून रोहन गुप्ता यांचे नाव जाहीर करण्यात आले. मात्र, ते आता शर्यतीतून बाहेर पडले आहेत. तत्पूर्वी, प्रवक्ते गौरव वल्लभ आणि ऑलिम्पिक पदक विजेता आणि बॉक्सर विजेंदर सिंग यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. मुंबईतील दिग्गज नेते संजय निरुपम यांनीही राजीनामा दिला आहे.