या वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आंबेगाव येथे असलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पासाठी त्यांनी विशेष निधी म्हणून ५० कोटी रुपये मंजूर केले आहेत.
हे थीम पार्क महाराज शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प शिवसृष्टी सारखाच असणार आहेत परंतु त्यातील राईड्स या थीम पार्कचे वैशिष्ठ्य असणार आहे. कारण त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील घटना आणि महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास दाखवण्यात येणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “या प्रकल्पात प्रतापगड माची येथील भवानी माता स्मारक, रायगड येथील बाजारपेठ, रायगड किल्ल्याचा देखावा, राजगडावरील राजसभा, पाली दरवाजाची प्रतिकृती आणि पन्हाळा युद्धाच्या देखाव्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे. या प्रकल्पाची किंमत ४३८.७ लाख रुपये आहे. या योजनेमुळे ३०० हून अधिक लोकांना रोजगार मिळेल.”
शिवसृष्टीचा हा प्रकल्प आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प आहे. याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. सरकारवाडा हा पहिल्या टप्प्यातील महत्त्वाचा भाग आहे. सरकारवाडा येथे कार्यस्थळ, संशोधन ग्रंथालय, प्रदर्शन व बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय किल्ल्यांचा प्रवास, राज्याभिषेकाचा देखावा, आग्र्याहून महाराजांची सुटका हे थ्रीडी तंत्रज्ञान वापरून साकारले आहे.
हे ही वाचा:
‘दोन बहिणीचं एकाच मुलाशी लग्न म्हणजे हिंदू संस्कृतीला काळिमा’
माजी राष्ट्राध्यक्ष कॅस्टिलो यांना तुरुंगात टाकल्यानंतर पेरूमध्ये आणीबाणी
अमित शहांचा सल्ला, ‘सीमाभागावर दावे नकोत’
धक्कादायक! दहा ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन
‘शिवसृष्टी’ प्रकल्पाची संकल्पना दिवंगत इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडली होती. त्याच्या उभारणीसाठी त्यांनी महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानची स्थापना केली होती. “हे एक असे ठिकाण आहे जिथे मराठा साम्राज्याची माहिती मिळू शकेल. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना (१९९० च्या दरम्यान) महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानासाठी आंबेगावमध्ये २७ एकर जमीन खरेदी करण्यात आली होती,” एका अधिकाऱ्याने सांगितले.