दिवंगत दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतील शिवसृष्टीचे साकारण्याचा कामाला वेग आला आहे. पुण्यातील नऱ्हे – आंबेगाव येथे साकारण्यात येत असलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पातील ‘सरकारवाडा’ बांधून पूर्ण झालेला आहे. शिवसृष्टी प्रकल्पातील हा पहिला टप्पा आहे. येत्या १९ फेब्रुवारी रोजी म्हणजे शिव जयंतीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. लोकार्पण सोहळयानंतर हा भाग लगेचच प्रेक्षकांसाठी खुला करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने शिवसृष्टी प्रकल्पाची सुरुवात १९९८-९९ मध्ये करण्यात आली आहे. पुण्याच्या हवेली तालुक्यातील आंबेगाव येथे उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांच्या निधी राज्य मंत्रिमंडळाने दिला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या १२ हजारांपेक्षा जास्त व्याख्यानांच्या माध्यमातून जो निधी उभा केला त्याची मोलाची मदतही हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी होत आहे. पहिल्या टप्प्यासाठी देणगीदारांकडून ६० कोटीची रुपये शिवसृषटी प्रकल्पासाठी मिळालेले आहेत.
हे ही वाचा:
थोर लढवैय्ये आणि महान योद्धे ‘तात्या टोपे’
एअर इंडियाच नाही या कंपन्यांचाही विमान खरेदी महोत्सव
गोव्याला जाताय.. मग जेलीफिशपासून सांभाळा. इतक्या लोकांना घेतलाय चावा
महाशिवरात्रीसाठी बेस्ट तर्फे विशेष बस सेवा
प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात भवानी माता स्मारक, राजसभा आणि डार्क राईड, रंगमंडल आणि तिसऱ्या टप्प्यात माची, गंगासागर, बहुविध आकर्षण केंद्र, कोकण याचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात बाजारपेठ, प्रेक्षागृह, वाहनतळ व अश्वारोहण, लँडस्केप- हार्डस्केप या कामांचा समावेश आहे. हि कामे पुढील दोन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहेत.
पहिला टप्प्यात पूर्ण झालेल्या सरकारवाडामध्ये कामकाजाचे ठिकाण, भव्य संशोधन ग्रंथालय, प्रदर्शनी दालन व बहुउद्देशीय सभागृह याचा समावेश आहे. . त्याच बरोबर देवगिरी, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड आणि विशाळगड या गड–किल्ल्यांचा फेरफटका घडवणारे ‘दुर्गवैभव’, शिवाजी महाराजांच्या काळात वापरत असलेल्या शस्त्रांचे विशेष दालन ‘रणांगण’, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती देणारे दालन , महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका ही ऐतिहासिक घटना या सर्व गोष्टी शिवप्रेमींना एका विशेष थिएटरच्या माध्यमातूनअनुभवता येतील. मॅड मॅपिंग तंत्रज्ञानद्वारे शिवाजी महाराज यांचे भाषण ऐकण्याची अनुभुती देखील मिळणार आहे.