शिवशाही बसचा ब्रेक फेल झाला आणि….

पुण्यात महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे.

शिवशाही बसचा ब्रेक फेल झाला आणि….

पुण्यात महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. बस आणि सात ते आठ गाड्यांच नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवशाही बसचा ब्रेक फेल झाल्याने ही मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत चार ते पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सर्व जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पुण्यात पाषाण- सुस परिसरात शिवशाही बसचा ब्रेक फेल झाल्याने ही बस चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. संबंधित शिवशाही बस बोरिवली ते सातारा असा प्रवास करत होती. ब्रेक फेल झाल्यामुळे ही बस थेट पुढे असलेल्या गाडीला धडकली. बस भरधाव असल्यामुळे पुढची गाडी पुढच्या गाडीला धडकली. अपघाताची ही मालिका एका मागेएक अशा सात ते आठ गाड्यांपर्यंत पोहोचली. यामध्ये काही जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने घटनास्थळापासून जवळ असणाऱ्या चेलाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या अपघातात एका बाईकचं देखील नुकसान झालं आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा

बोरिवली ते ठाणे प्रवास आता तासात नाही मिनिटांत

रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’

नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले

‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’

पुण्यात आज आणखी एक थरारक घटना घडली. पुणे- मुंबई यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेसवेवर आज पहाटे चार वाजेच्या सुमारास पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या कंटेंनरचा खंडाळा बोरघाटात ब्रेक फेल झाला. उतारावर ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरने पुढे जाणाऱ्या एका कंटेनरला धडक दिल्यावरही चालकाने शिताफीने कंटेनरवर ताबा मिळवला. मात्र, यात चालक जखमी झाला. मात्र, मोठी दुर्घटना टळली.

Exit mobile version