एकीकडे मंदिरे उघडण्यास राज्यातील ठाकरे सरकार विरोध करत असताना शिवसेनेचे नेते मात्र मागील दाराने मंदिरांत जाऊन देवदर्शन करत असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे सर्वसामान्यांना मंदिरात जाण्यास मनाई आहे पण खास लोकांना मात्र मंदिराचे दरवाजे सताड उघडे आहेत, असे संतापजनक चित्र दिसत आहे. शिवसेनेच्या एका खासदारानेच सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी सिद्धीविनायक मंदिरात मागील दाराने जाऊन दर्शन घेतल्याचा हा व्हीडिओ आहे. सध्या ईडीच्या रडारवर असलेले मंत्री अनिल परब हेदेखील एका मंदिरात गेल्याचा दावा आणखी एका व्हीडिओत करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
अनिल परब ईडीसमोर गैरहजर! पत्र पाठवून सांगितले कारण…
दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ खेळाडू निवृत्त
आता वाहनांच्या हॉर्नमधून ऐकू येणार भारतीय वाद्य
पुणे- कोल्हापूर प्रवास फक्त अडीच तासात…
सिद्धीविनायक मंदिरात शेवाळे यांनी दर्शन घेतले. चित्रपट दिग्दर्शक एकता कपूर हिनेही असेच मागील दाराने सिद्धीविनायकचे दर्शन घेतल्याचे समोर येते आहे. मंदिरातील लोकांना भेटायचे आहे, हे कारण सांगत अनेक लोक मंदिरात दर्शनासाठी येत असल्याचे मंदिराच्या रजिस्टरवरून स्पष्ट होत असल्याचे व्हीडिओत दिसते आहे.
शिवसेना खासदार राहुल शेवाळ यांनी सिद्धिविनायकाचे मागील दाराने दर्शन घेतले. मग सर्वसामान्य लोकांनी काय पाप केलंय? देवावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करू नका आणि मंदिरे कडीकुलुपात ठेवून जनतेचाही अंत पाहू नका. @ShivSena @LoksattaLive pic.twitter.com/S9nT1eD9a8
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 31, 2021
यावर भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे की, शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी सिद्धिविनायकाचे मागील दाराने दर्शन घेतले मग सर्वसामान्य लोकांनी काय पाप केले? देवावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करू नका आणि मंदिरे कडीकुलुपात ठेवून जनतेचाही अंत पाहू नका.