‘प्रचंड वाऱ्यामुळे पुतळा कोसळला’

मुख्यमंत्री शिंदेंचे वक्तव्य

‘प्रचंड वाऱ्यामुळे पुतळा कोसळला’

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज अचानकपणे कोसळला. आठ महिन्यांपूर्वीच शिवरायांच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. आज अचानकपणे हा पुतळा खाली कोसळला. पुतळा कोसळन्यामागचे कारण अध्याप समोर आलेले नाही. या घटनेवरून शिवभक्तांकडून संताप व्यक्त केला जात असून विरोधक टीका करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधकांकडे टीका करायला बराच वेळ आहे. मी त्याकडे लक्ष देत नाही. झालेली घटना ही दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्या दैवत आहेत. हा पुतळा नौदलाकडून उभारण्यात आला होता, पुतळ्याचे डिझाईन देखील नौदलानेच केले होते, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हे ही वाचा :

जम्मू काश्मीर निवडणूक: पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या हाती नेतृत्व !

नको तुमचे अनुदान! ममतांवर दुर्गा पूजा समित्या नाराज !

सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला !

जीपीएस बिघडल्याने दिशा चुकली, अन जीवाला मुकले !

ते पुढे म्हणाले, ताशी ४५ किमी वेगाने एवढ्या जोरात वारा वाहत होता, त्यामुळे पुतळा पडला आणि नुकसान झाले. उद्या पीडब्लूडी आणि नौदलाचे अधिकारी त्या ठिकाणाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर शिवरायांच्या  पुतळ्याला भेट देऊन या मागची करणे तपासणार आहेत. या घटनेमागील कारणे शोधून काढू आणि पुन्हा एकदा त्याच ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारू, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Exit mobile version