मध्यप्रदेशात भाजपने बाजी मारत मोठा विजय मिळविला.मध्यप्रदेश राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण म्हटलं तर शिवराज सिंह चौहान यांच्या नावाची चर्चा होती.मात्र, भारतीय जनता पार्टीने मोहन यादव यांच्या नावाची घोषणा केली.मोहन यादव यांच्या नावाची घोषणा होताच शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मोहन यादव हे आता शिवराज सिंह चौहान यांची जागा घेतील.दरम्यान, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या महिला समर्थकांची भेट घेतली तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या महिलांचे डोळे पाणावलेले पाहायला मिळाले.या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.या व्हिडिओत शिवराज सिंह चौहान यांना दोन महिला बिलगून ढसाढसा रडताना दिसत आहेत.
शिवराज यांच्या राजीनाम्यानंतर काही महिला खूपच भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, आम्ही तुम्हाला निवडलं होतं, तुम्ही निवडणुकीत इतकी मेहनत केलीत.आम्ही तुम्हाला सोडणार नाही,यावर शिवराज सिंह चौहान म्हणाले, मी कुठे जातोय, मीही तुम्हाला सोडणार नाही.शिवराज सिंह चौहान सुद्धा भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.व्हिडिओमध्ये महिला बोलत आहेत की, मामा, तुम्ही खूप मेहनत घेतली, आणि आम्ही तुमच्यासाठी खूप मेहनत घेतली आणि तुम्ही जिंकलात.भाऊ आम्ही तुम्हाला मतदान केले.
हे ही वाचा:
भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री!
कमाल झाली ! बसतिकिटाची मशीन चोरणाऱ्या चोरानेच कंटक्टरला विचारले तिकीट
केरळच्या राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप; शारीरिक इजा करण्याचा कट रचल्याचा आरोप
खैबर पख्तुनख्वाच्या पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांचा हल्ला, २३ ठार!
शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाले की, “मी जेव्हा कोणी नव्हतो, तेव्हा सुद्धा मुलींची लग्न लावून द्यायचो. मुख्यमंत्री बनल्यानंतर मी लाडली बेटी आणि कन्या विवाह योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून मी मुली आणि बहिणींचे जीवन सुधारु शकलो” “मध्य प्रदेशची कमान हाती आली, तेव्हा हे एक बीमारु आणि मागास राज्य होतं. मी पूर्णपणे प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम केलं. कृषी क्षेत्रात चमत्कार झाला. याच मला समाधान आहे” असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आज जेव्हा मी इथून निरोप घेत आहे, तेव्हा मला समाधान आहे की २०२३ मध्ये पुन्हा एकदा भाजपने प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले.माझे मन आनंदाने आणि समाधानाने भरले आहे.मला विश्वास आहे की, मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार राज्यात सुरु असलेले प्रकल्प पूर्ण करेल.प्रगती आणि विकासाच्या बाबतीत मध्य प्रदेश एक नवी उंची गाठेल.मी त्यांना पाठिंबा देत राहीन, असे शिवराज सिंह चौहान म्हणाले.