25 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषखासगी चालकांकडून शिवनेरी बस सेवा सुरू; संपात फूट पाडण्याचा प्रयत्न, आंदोलकांचा आरोप

खासगी चालकांकडून शिवनेरी बस सेवा सुरू; संपात फूट पाडण्याचा प्रयत्न, आंदोलकांचा आरोप

Google News Follow

Related

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटीचे कर्मचारी आपला संप मागे घेण्यास तयार नाहीत, त्यामुळे एसटी महामंडळाने शिवनेरी बसद्वारे पुणे आणि नाशिकमधून सेवा सुरू केली आहे.

शिवनेरी बसवर खासगी चालकांची ड्युटी लावून बस नाशिकवरून पुणे, मुंबईसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. सुरू असलेल्या संपात फूट पाडण्यासाठी शिवनेरी बससेवा सुरू केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तसेच शिवनेरी बसेसवरील एसटी महामंडळाचा लोगो काढण्याची मागणी देखील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा सहावा दिवस आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीवर कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तर न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरु असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देणाऱ्या भाजप नेत्यांवर परिवहन मंत्री अनिल परबांनी आरोप केले असून काही कामगारांना कामावर रुजू व्हायचंय मात्र त्यांची अडवणूक सुरु असल्याचा दावा अनिल परब यांनी केला आहे.

हे ही वाचा:

उपरती झाली; स्वा. सावरकर यांचे नाव संमेलन गीतात समाविष्ट

नवाब मलिक यांनी केले ईडीचे स्वागत

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये कोण ठरणार सरस?

ऑफिसच्या वेळेनंतर बॉसने फोन करणे आता बेकायदेशीर

आर्थिक कोंडीत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर सेवेतून बडतर्फ करण्याचीही कारवाई सुरू आहे. तर दुसरीकडे महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे आपली लालपरी मोठया आर्थिक संकटात सापडली आहे. संप करून तिला पुन्हा आर्थिक गर्तेत लोटू नका. सध्या एसटीचा तोटा १२००० कोटी रुपयांपर्यंत पोहचलेला आहे, असे एसटी महामंडळाने म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा