‘लढाऊ’ शिवांगी राफेलमधून घडवणार इतिहास

फ्रान्समधील कवायतींमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या गटामध्ये तिचा समावेश

‘लढाऊ’ शिवांगी राफेलमधून घडवणार इतिहास

भारतीय हवाई दलाची पहिली महिला वैमानिक शिवानी सिंग राफेल लढाऊ विमान उडवण्यास सज्ज झाली आहे. फ्रान्समध्ये होणाऱ्या बहुराष्ट्रीय कवायतींमध्ये ती सहभागी होणार आहे.

फ्रान्समधील कवायतींमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या गटामध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे. राफेल वैमानिकांमधील ती पहिली लढाऊ महिला वैमानिक आहे आणि हे बहुउद्देशीय लढाऊ विमान उडवून ती नवा इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाली आहे.

शिवानी सिंग ही सन २०१७मध्ये भारतीय हवाई दलात दाखल झाली होती. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या महिला लढाऊ वैमानिकांच्या दुसऱ्या बॅचमध्ये तिचा समावेश करण्यात आला. राफेल उडविण्याआधी शिवांगीने मिग-२१ बिसॉन विमानातूनही झेप घेतली आहे.

हे ही वाचा:

भारतीय सैन्याच्या सेवेत एक बकरा तोही हवालदार?

फडणवीसांचे सोडा, तुम्हाला साळवींचे अंतरंग तरी कळतात का?

प्रकल्प नकोत बेरोजगारीही नकोमग हवंय काय कोकणाला?

चालकाची बळजबरी, बेंगळुरूत महिलेने रॅपिडो बाईकवरून मारली उडी !

मूळची वाराणसीतील असणाऱ्या शिवांगीचे सध्या प्रशिक्षण सुरू आहे. लवकरच ती हरयाणातील अंबालानजीक तळ असणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या गोल्डन ऍरोज स्क्वाड्रनचा एक महत्त्वाचा भाग होईल. सन २०२०मध्ये अतिशय कठोर निवड चाचण्या पार करत राफेल वैमानिक म्हणून शिवानी सिंगची निवड झाली होती. आता ती राफेल उडवणारी पहिली लढाऊ महिला वैमानिक ठरणार आहे.

Exit mobile version