30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषशिवम दुबेची पत्नी अंजुम खान 'धोनीची फॅन'

शिवम दुबेची पत्नी अंजुम खान ‘धोनीची फॅन’

Google News Follow

Related

महेंद्रसिंग धोनीचे अनेक चाहते तुम्ही देशात आणि जगात पाहिले असतील. काही क्रिकेटपटू त्याला पाहून खेळायला शिकले आहेत. तर काही चाहते असे आहेत जे फक्त माहीसाठी क्रिकेट पाहतात. असाच काहीसा प्रकार शिवम दुबेची पत्नी अंजुम खानसोबत घडला. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ती आता चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.या पोस्टमध्ये अंजुम खान एमएस धोनीसाठी भावूक होताना दिसत आहे.

काय आहे या पोस्टमध्ये?
अंजुम खानने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिच्यासोबत तिचा पती शिवम दुबे आणि एमएस धोनी आहेत. यासोबतच एक खूप लांबलचक इमोशनल कॅप्शनही लिहिली आहे.

अंजुमने लिहिले आहे की, जेव्हा तिने धोनीला पहिल्यांदा टीव्हीवर पाहिले तेव्हापासून ती त्याची फॅन बनली होती. धोनीमुळेच आपण क्रिकेट बघायला सुरुवात केली. अंजुमने असेही लिहिले आहे की, जेव्हा ती धोनीला पहिल्यांदा भेटली तेव्हा ती खूप भावूक झाली होती. माझ्यासाठी धोनी केवळ क्रिकेटपटू नाही, तर तो एक भावना आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तो फलंदाजीसाठी मैदानात उतरतो, तेव्हा माझं हृदय जोरात धडधडू लागतं.

अंजुमने असेही सांगितले की, तिचा पती शिवमला धोनीवरील तिच्या आदराविषयी माहिती आहे. तिने लिहिले की, शिवमला माहित आहे की धोनी माझ्यासाठी किती महत्वाचा आहे. मी धोनीला ‘सर’ न म्हणण्यावर त्याचा कधीच आक्षेप नाही.

हेही वाचा :

हिंदू मुलीवर अत्याचार करून प्राणघातक हल्ला

हैदराबादची ‘मालवाहतूक ट्रेन’ सुसाट; दिल्लीला पराभूत करून दुसऱ्या क्रमांकावर झेप

कर्नाटकमध्ये भाजप नेत्याच्या मुलासह चौघांची हत्या

मतदानाच्या दुसऱ्या दिवशी भाजप उमेदवाराचा मृत्यू!

अंजुमने पुढे लिहिले की, धोनी तिच्यासाठी एक इमोशन आहे. धोनी जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरतो::छ तेव्हा स्टेडियममधील आवाजाची पातळी विक्रमी पातळीवर पोहोचते. धोनीचे लांब केस तिला त्याच्या सुरुवातीच्या क्रिकेटच्या दिवसांची आठवण करून देतात, असेही तिने सांगितले. अंजुमने लिहिले आहे की, शिवम धोनीच्या संघात खेळण्याचे तिचे स्वप्न होते. जेणेकरून तो त्याच्याकडून शिकू शकेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा