29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरविशेषब्रिटनमधील जगदंबा तलवार, वाघनखे शिवराज्याभिषेकाला भारतात येतील?

ब्रिटनमधील जगदंबा तलवार, वाघनखे शिवराज्याभिषेकाला भारतात येतील?

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या जयंतीनिमित्त परत आणण्याचा प्रयत्न

Google News Follow

Related

प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार आणि वाघ नखे ब्रिटनमध्ये आहेत. पण आता या दोन्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या मौल्यवान चीजवस्तू लवकरच भारतात येण्याचा मार्ग खुला होणार आहे. सांस्कृतिक आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार जगदंबा तलवार आणि वाघ नखे आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मुनगंटीवार यांनी रविवारी पुन्हा त्याचा पुरुच्चार केला आहे. डॉ. आपापसाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात बोलतांना मुनगंटीवार यांनी, शिवाजी महाराजांची वाघनख आणि जगदंबा तलवार परत आणणार असल्याचा दावा केला आहे.

‘जगदंबा’ तलवार आणि वाघनखे भारतात आणण्यासाठी आपण ब्रिटीश उपउच्चायुक्त ऍलन गेमेल आणि राजकीय द्विपक्षीय व्यवहार विभागाचे उपप्रमुख इमोजेन स्टोन यांच्याशी चर्चा केली आहे. ब्रिटिश सरकारकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाले आहे. त्यांच्याबरोबर अत्यंत समाधानकारक चर्चा झाली. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीच्या महोत्सवाच्या निमित्ताने ब्रिटनकडून ही जगदंबा तलवार आणि वाघनखे मिळवण्याचा मुनगंटीवार यांचा संकल्प आहे. त्याच हेतूने ब्रिटिश सरकारबरोबर ही बैठक घेण्यात आली होती.

हे ही वाचा:

देशात कोविडचे १०,०९३ नवे रूग्ण, तरीही किंचित घट

राजकीय सत्तेपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी

काँग्रेसला ना उद्धवजींच्या मानाची चिंता, ना मानेची

शरद पवार आता नेमकं काय करतील?

महाराष्ट्र शासन शिवराज्याभिषेकाचा महोत्सव महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने देखील ही बैठक महत्वाची मानली जात आहे. आपण पुढील महिन्यात ब्रिटनला भेट देणार असून छत्रपती शिवाजी महाराजांनी १७व्या शतकात वापरलेली जगदंबा तलवार आणि वाघनखे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या जयंतीनिमित्त परत आणण्याचा प्रयत्न करणार आहे हा क्षण मोठ्या थाटात साजरा केला जाईल असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

 अशी आहे जगदंबा तलवार

जगदंबा तलवारीच्या सरळ पात्याची लांबी १०० सेमी असून मूठ आणि मागील कळी यांची लांबी २२ सेमी आहे. तलवारीची एकूण लांबी १२२ सेमी इतकी आहे. तलवार पूर्णपणे दुधारी नसून तिची खालची बाजू पूर्ण धारेची आहे आणि वरची बाजू ७१ सेमी पर्यंत बिन धारेची आणि जाड आहे. तलवारीची मूठ शुद्ध सोन्याच्या जाडसर पत्र्याने बनलेली आहे, त्यावर बाहेरच्या बाजूने सर्व हिरे आणि माणके जडवलेले आहेत. तलवारीवर ७३ माणके असून त्यापैकी २ माणके पडलेली आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ही तलवार हाताळली होती. त्यांनी या तलवारीचे वर्णन केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा