पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. मोदी आदिवासी गौरव दिनानिमित्त आयोजित परिषदेला संबोधित करत आहेत. जनतेला संबोधित करताना, आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली. मोदी म्हणाले ‘पद्मविभूषण’ बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील, त्यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत नेण्यात अमूल्य योगदान दिलेले आहे. मध्यप्रदेश सरकारने त्यांना कालिदास पुरस्कारही दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आदर्श बाबासाहेब पुरंदरे यांनी देशासमोर ठेवले, ते आदर्श आपल्याला सतत प्रेरणा देत राहतील. बाबासाहेब पुरंदरे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”
Addressing the Janjatiya Gaurav Divas Mahasammelan in Bhopal. https://t.co/WrVPZrqni0
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2021
शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास जगताची न भरून निघणारी हानी झाली आहे अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. तर बाबासाहेब त्यांच्या साहित्यातून कायमच जिवंत राहतील असे देखील पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे हे आज म्हणजेच सोमवार, १५ नोव्हेंबर रोजी कालवश झाले. वयाच्या १०० वर्षी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेबांच्या निधनाने सारा महाराष्ट्र हळहळल्याचे चित्र दिसत आहे. तर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
काय आहे दादरा, नगर हवेलीच्या मुक्ती संग्रामातील बाबासाहेब पुरंदरेंची भूमिका?
… म्हणून आजचा दिवस मोदींसाठी भावनिक
ठाकरे सरकार राज्यात इस्लामिक दंगली भडकावतंय
अनिल देशमुख २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडीतच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. मी माझे दुःख शब्दात व्यक्त करू शकत नाही असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. तर बाबासाहेबांमुळे येणाऱ्या पिढ्यांचे छत्रपती शिवरायांशी नाते जोडले जाईल त्यासाठी त्यांचे आभार असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे. काही महिन्यांपूर्वी बाबासाहेबांच्या शताब्दी सोहळ्याला पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली होती. त्या आठवणींनाही पंतप्रधान मोदींनी उजाळा दिला आहे.