सिंधुदुर्गच्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच शिव भक्तांनी घटनास्थळी धाव घेत संताप व्यक्त केला.
आठ महिन्यापूर्वी अनावरण करण्यात आलेला छत्रपतींचा पुतळा कोसळल्याने निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचे आरोप होत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक तहसीलदार आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह कोकण भागात वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. याच वादळी वाऱ्यामुळे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे.
हे ही वाचा :
जीपीएस बिघडल्याने दिशा चुकली, अन जीवाला मुकले !
‘बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सुरक्षित रहेंगे’
राहुल गांधींच्या जन्माष्टमी ट्विटमधून श्रीकृष्णच गायब!
‘बंगालचे लोक ममतांना सत्तेतून हटवून त्यांचे गंगेत विसर्जन करतील’
नौदल दिनानिमित्त ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. दरम्यान, यावर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडेच सार्वजनिक बांधकाम विभाग असल्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील, परंतु शिवरायांचा पुतळा उभे करणे हे पहिले कर्तव्य आहे, असे मंत्री केसरकर म्हणाले.