शिवरायांची प्रेरणा!! महाराष्ट्रातील पाच ठिकाणे होणार शिवसृष्टीमय

शिवनेरी, गोराई, बुलढाणा, संभाजीनगर, नाशिक व रामटेक येथे उभारणार शिवसृष्टी, पर्यटन मंत्री लोढा यांची माहिती

शिवरायांची प्रेरणा!! महाराष्ट्रातील पाच ठिकाणे होणार शिवसृष्टीमय

छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती पुढील पिढयांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याचा प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र शासन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलढाणा, संभाजीनगर, नाशिक व रामटेक येथे ५ ठिकाणी शिवसृष्टी,उद्यान,संग्रहालय व शिवकालीन थिम पार्क व उभारणार आहे.

महाराष्ट्रात पर्यटनाला चालना मिळावी व त्यातून रोजगार निर्मिती व्हावी , यासाठी राज्य सरकार व पर्यटन विभाग विविध उपक्रम राबवत आहेत. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायचा असतो. महाराष्ट्रात अशी एक इंच ही जागा सापडणार नाही जी शिवरायांच्या इतिहासाशी निगडित नाही.छत्रपती शिवरायांच्या या प्रेरणादायी इतिहासाची पुढच्या अनेक पिढयांना व पर्यटकांना प्रेरणा देण्यासाठी राज्य सरकार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहयोगाने महाराष्ट्राच्या विविध ५ ठिकाणी शिवसृष्टी /उद्यान/संग्रहालय आणि शिवकालीन थीम पार्क उभारण्यात येणार आहे. यासर्व कामांसाठी ४१० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली असून एक वर्षभरात सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मंत्रालय दालन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. काही दिवसांपूर्वी गोराई (मुंबई) येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली व आता त्या ठिकाणी २५ एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे युध्य कौशल्य व आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझिअम) उभारले जाणार असल्याचे , मंत्री लोढा म्हणाले. बुलढाणा येथील सिंदखेडराजा हे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान आहे. त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परिवाराची वंशावळ व इतिहास सांगणारे संग्रहालय उभारले जाणार आहे. तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास सांगणारे म्युझिअम फर्दापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे उभारण्यात येणार आहे, असे मंत्री मंगल प्रभात लोढा पुढे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कारभारात अवलंबिलेल्या कृषी नीती, आर्थिक नीती तसेच समजोउद्धारासाठी अवलंबिलेल्या नीती या समाजाला चिरंतर मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत. याचा अभ्यास व माहिती सांगणारे संग्रहालय / थीम पार्क नाशिकमध्ये येत्या काळात उभारणार असल्याची माहिती लोढा यांनी दिली.ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य व त्यांचा भारतीय संस्कृती व जागतिक युद्धनीतीवर झालेला प्रभाव याची प्रेरणा देणारे संग्रहालय / थीम पार्क नागपूर येथे उभारण्यात येणार आहे. पुण्यातील शिवनेरी किल्याच्या पायथ्याशी वडज गाव येथे शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वीचा साधारण १० ते १५ वर्षांचा काळ व त्यांच्या जन्मांतराचे बालपण आणि राजमाता जिजाऊंनी केलेले संस्कार याचा इतिहास सांगणारी शिवसृष्टी उभारली जाणार आहे.

या शिवसृष्टी, उद्यान आणि म्युझिअम, थीम पार्कच्या माध्यमातून पुढील पिढयांना राजमाता जिजाऊ ,छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा तसेच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल, असे मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारण्यात येणार आहे या कामासाठी ७० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच रामटेक येथील छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालयासाठी प्रत्येकी ५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे, मंत्री लोढा यांनी सांगितले.

हे ही वाचा:

जीवरक्षकाला हुलकावणी देत जुहूकिनारी गेलेल्या ‘त्या’ चारही मुलांचे मृतदेह सापडले

सात महत्त्वाच्या शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी अडीच हजार कोटींचे प्रकल्प उभारणार

रील बनवताना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

निदान जाहिरातीमुळे सरकार पडते का पाहू!

थीम पार्क,आचार्य चाणक्य म्युझियम

भगूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर थीम पार्क साठी १५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकरांचे पूर्ण जीवन चरित्र व अंदमान-निकोबार कारागृहातील प्रमुख घटना यांचा यामध्ये समावेश असेल.कार्ला – आचार्य चाणक्य म्युझिअमसाठी ७५ कोटी रूपये तर आचार्य चाणक्य नीतीचे ५ प्रखंड राजनीती अर्थनीती सामाजिक नीती युद्ध नीती, धर्म निती व याचसोबत ७ दिवस ते १ महिन्याचा अभ्यासक्रम शिकविण्यात येईल.शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांकरीता पडघा (ता.भिवंडी, जि.ठाणे) येथे निवासाची व्यवस्थेसाठी ३ कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे.

प्रत्येक शाळा व महाविदयालयात युवा पर्यटन क्लब

नव्या पिढीला पर्यटन स्थळांचे जतन आणि संवर्धनाचे महत्व कळावे यासाठी लवकरच प्रत्येक शाळा व महाविद्यालयात पर्यटन क्लब स्थापन करण्यात येणार आहे.

अंगणवाडी स्तरावर ही साजरा केला जाणार योग दिवस

महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, २१ जून हा जगभरात “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक अंगणवाडी स्तरावर, अंगणवाडी क्षेत्रातील किशोरवयीन मुली, नोंदणी झालेल्या महिला (गरोदर महिला वगळून) यांचेसाठी अंगणवाडीत प्रशिक्षणाचा उपक्रम आयोजित करुन “आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येणार आहे.

Exit mobile version