संभलनंतर उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये वर्षानुवर्षे बंद असलेली मंदिरे पाहायला मिळत आहेत. अनेक मंदिरे समोर आल्यानंतर त्याठिकाणी आता स्वच्छता आणि पूजा केली जात आहे. याच दरम्यान, फिरोजाबादच्या मुस्लीमबहुल भागात एक जुने मंदिर देखील सापडले आहे. हे मंदिर ३० वर्षांपासून बंद असल्याची माहिती आहे. प्रशासनाने रविवारी (५ जानेवारी) या बंद मंदिराचे कुलूप उघडले. हिंदुत्ववादी संघटना बजरंग दलाच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली. यावेळी पोलीस दल व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फिरोजाबादमधील रसूलपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गल्ली क्रमांक ८ मध्ये शहीद चौकाच्या समोर, अत्यंत चिंचोळ्या गल्लीत मुस्लीमबहुल वस्ती असून, गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या एका मंदिराला वर्षानुवर्षे कुलूप होते. हे शिवमंदिर बऱ्याच दिवसांपासून बंद असल्याची माहिती बजरंग दलाला मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात करून मंदिराचे कुलूप उघडले. मुस्लीम बहुल भागात मंदिर असल्याने कोणीतरी पुढे येवून याचा विरोध करेल अशी चर्चा होती. मात्र, मंदिराचे कुलूप उघडण्यास कोणीही विरोध केला नाही.
हे ही वाचा :
डोक्यावर १५ जखमा, यकृताचे ४ तुकडे, हृदय फाटले !
वाल्मिक कराडसोबत फोटो व्हायरल; एसआयटीमधून तीन अधिकाऱ्यांची उचलबांगडी
छत्तीसगडमधील पत्रकार मुकेश हत्या प्रकरणातील मुख्य संशयिताला अटक
कॅनडाचे पंतप्रधन ट्रुडो देणार राजीनामा?
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक दशकांपूर्वी या ठिकाणी एका हिंदू कुटुंबाचे घर होते. त्याच ठिकाणी शेजारी हे मंदिर होते. हिंदू कुटुंब घर सोडून निघून गेल्यावर मंदिराला टाळे लागले. दरम्यान, मंदिराची उघडली केल्यानंतर मंदिराच्या आतील भिंतींवर धार्मिक शब्द लिहिलेले आणि खंडित मूर्ती सापडल्या. मंदिराच्या घुमट छताखाली अजूनही साखळी लटकलेली आहे. यावरून याठिकाणी पूर्वी घंटा टांगलेली असल्याचे दिसून येते.
याबाबत माहिती देताना फिरोजाबाद शहर दंडाधिकारी राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, हे मंदिर ६० वर्षे जुने असून बरेच दिवसांपासून ते बंद होते. हे मंदिर उघडल्यानंतर स्थानिक समाजाला त्यांचे धार्मिक अधिकार परत मिळाले आहेत. स्थानिक मुस्लिम समाजानेही याचे स्वागत केले. मंदिर उघडण्यास आपला कोणताही आक्षेप नाही आणि येथे कोणताही वाद नाही, असे त्यांनी सांगतिले.